‘बेबो’ करीनाला करायचंय बहिण करिश्मा कपूरसोबत काम, परंतु सांगितली ‘ही’ अडचण

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार करीना कपूर टॉपच्या अभिनेत्रींपैकी आहे. तिची बहिण अभिनेत्री करिश्मा कपूरही 90 च्या दशकातील फेमस अ‍ॅक्ट्रेसपैकी एक आहे. करिश्माचा बोल्ड अंदाज आणि अभिनयाचे चाहते आजही वेडे आहेत. तुम्हाला माहिती आहे का लवकरच या दोन्ही अभिनेत्री आणि बहिणी एकत्र काम करताना दिसणार आहे. रिपोर्टनुसार करीना कपूर आणि करिश्मा कपूर 2001 साली आलेल्या जुबैदा या सिनेमाच्या सीक्वलमध्ये एकत्र काम करताना दिसणार आहेत. अंग्रेजी मीडियम या सिनेमाच्या प्रमोशनल इंटरव्युमध्ये बोलताना करीनानं याबाबत इच्छा व्यक्त केली आहे.

अंग्रेजी मीडियमच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असणाऱ्या करीनाला मुलाखीतत विचारण्यात आलं की, तिला करिश्मा कपूरसोबत काम करायचं आहे का. यावेळी क्षणाचाही विलंब न लावता तिनं हो असं उत्तर दिलं. अद्याप अशी एखादी चांगली स्क्रिप्ट नाही मिळाली जी आम्हाला दोघींना आवडेल असंही तिनं सांगितलं.

https://www.instagram.com/p/B9eqYu3FiFG/

करीना कपूर म्हणाली, “आम्हाला नेहमीच वाटायचं की, एकत्र काम करावं. परंतु अशी स्क्रिप्ट नाही मिळाली जी आम्हाला दोघींना आवडेल. जर कोणी स्क्रिप्ट घेऊन आलं तर आम्ही नक्कीच काम करू.”

https://www.instagram.com/p/B9dySy1lkrk/

इरफान खान आणि करीना कपूर यांचा अंग्रेजी मीडियम हा सिनेमा आता 13 मार्च 2020 रोजी रिलीज होणार आहे. अंग्रेजी मीडियम हा सिनेमा आधी 20 मार्च रोजी रिलीज केला जाणार होता. परंतु आता हा सिनेमा 7 दिवस आधीच रिलीज होणार आहे. होमी अदजानियानं हा सिनेमा डायरेक्ट केला आहे. सिनेमा रिलीज डेट बदलली आहे.

करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा अंग्रेजी मीडियम हा सिनेमा 13 मार्च रोजी रिलीज होणार आहे. याशिवाय ती तख्त सिनेमातही काम करताना दिसणार आहे. हा सिनेमा 2021 मध्ये रिलीज होणार आहे. करीनाकडे लाल सिंह चड्ढा हा सिनेमाही आहे.