Kareena Kapoor – Singham Again | चेहऱ्यावर जखम, हातात बंदूक आणि धगधगती आग.. ‘Singham Again’ मध्ये बाजीरावसोबत अवनीही उचलणार हत्यार..!

पोलीसनामा ऑनलाइन टीम | अलीकडेच सर्वत्र बहुचर्चित चित्रपट ‘सिंघम अगेन (Singham Again) ची चर्चा रंगताना दिसत आहे (Kareena Kapoor – Singham Again). या चित्रपटामध्ये अजय देवगन आणि करिना कपूर सोबत आणखी काही नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटात अजय देवगन सोबत करिना त्याचा बायकोची भूमिका साकारणार आहे. चित्रपटामध्ये तिनं अवनीची भूमिका साकारली होती. सोशल मीडियावर करिना कपूर खानने चित्रपटा संदर्भात एक फोटो शेअर केला आहे (Kareena Kapoor – Singham Again).

करिना कपूर खाननं (Kareena Kapoor Khan) सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोमध्ये तिचा लूक अगदीच अनोखा दिसत आहे. या फोटोमध्ये तिच्या हातात बंदूक दिसत आहे. तर सिंघममधील अवनीला बंदूक का उचलायची गरज पडली, हे सध्या गुपित ठेवण्यात आलं आहे (Kareena Kapoor – Singham Again).

दरम्यान, अजय देवगन (Ajay Devgan) आणि करिना कपूर सोबतच या चित्रपटामध्ये टायगर श्रॉफ (Tiger Shroff), रणवीर सिंग (Ranveer Singh), दीपिका पादुकोन (Deepika Padukone) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच या चित्रपटामध्ये खलनायक म्हणून अर्जून कपूरचं (Arjun Kapoor) नाव फायनल करण्यात आलं होत. मात्र सध्या खलनायक कोण हे अद्याप समोर आलं नाही. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून, अद्याप याची तारीख समोर आली नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC Fort Competition | पुणे महानगरपालिकेची किल्ले स्पर्धा गुरुवारपासून, विजेत्यांना रोख बक्षिसे

Pune Krushi Utpanna Bazar Samiti | सुरक्षारक्षकांची फौज तैनात असताना ‘मार्केटयार्डात’ शेतमालाच्या चोर्‍या वाढल्या; शेतकरी व विक्रेते हवालदील

ACB Trap On Maharashtra Jail Police | लाच घेताना कारागृहाचे तीन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात, 2 महिला कर्मचाऱ्यांचा समावेश