Pune Krushi Utpanna Bazar Samiti | सुरक्षारक्षकांची फौज तैनात असताना ‘मार्केटयार्डात’ शेतमालाच्या चोर्‍या वाढल्या; शेतकरी व विक्रेते हवालदील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Krushi Utpanna Bazar Samiti | मार्केटयार्डातील फळे व भाजीपाला मंडईसाठी तब्बल ८० सुरक्षा रक्षक असताना शेतमालाच्या चोर्‍या वाढल्या आहेत (Marketyard Pune). केवळ तीनच प्रवेशद्वार आणि सुरक्षा रक्षकांची भलीमोठी फौज असताना शेतमालाला पाय फुटू लागल्याने शेतकरी व विक्रेते देखिल हवालदील झाले आहेत (Theft In Marketyard). दरम्यान, यापुढे बाजारात शेतमालाच्या चोर्या झाल्यास त्याची नुकसान भरपाई ठेकेदारांच्या बिलातून वसुल करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती बाजार समितीची सभापती दिलीप काळभोर (Deepali Kalbhor) यांनी दिली. (Pune Krushi Utpanna Bazar Samiti)

मार्केटयार्डातील फळे-भाजीपाला विभागात ८० सुरक्षा रक्षक तर गुळ भुसार बाजारात ६३ सुरक्षा रक्षक पुरविण्याचा ठेका दोन स्वतंत्र ठेकेदारांकडे ठेका दिला आहे. मार्केटयार्डमध्ये यापुर्वी शेतीमालाच्या चोर्‍यांसह, गाळयांवरच नशेबाजी करणे, सीसीटीव्ही कॅमेरे, एसीचे बॉक्स तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. गुळ भुसार बाजारात नेहरू रस्त्यावरील दोन दुकाने फोडली होती. त्यापैकी एका दुकानातुन सुमारे ३० हजार रूपयांची तर, भगवती ट्रेडर्स या दुकानातून सुमारे तीन लाखांची चोरी झाली होती. शिवनेरी रस्त्यावरील ज्योती पान शॉप फोडून रोख रक्कमसह सुमारे पन्नास ते साठ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. मात्र, अलीकडे कांदा, लसूण, आलं या फळाभाज्यांचे भाव वाढल्यानंतर चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे बाजार घटक हैराण झाले असून शेतकरी, आडतदार यांचे आर्थिक नुकसान होत आहे. (Pune Krushi Utpanna Bazar Samiti)

बाजारात सुरक्षा रक्षक असतात का ?

सुरक्षा रक्षक ठेकेदारांवर वर्षभरात कोट्यवधी रूपये खर्च होतो. मात्र, सध्या बाजारात दररोज वाहतुककोंडी होत असताना ठेकेदारांचे सुरक्षा रक्षकच नसल्याचे बाजारातील आडत्यांकडून सांगितले जाते. वाहतुक कोंडी सोडविण्याची वेळ कधी सचिव तर काहीवेळी संचालकांवर येत आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षकांवरील खर्च नक्की जातो कुठे अशी चर्चा बाजार आवारात आहे.

शेतमालाच्या चोर्यांच्या वाढलेल्या घटनांच्या पार्श्वभुमीवर बुधवारी (दि.८) आडते असोसिएशनचे अध्यक्ष,
पदाधिकारी, आडतदार, ठेकेदार, उपसभापती, सचिव यांची संयुक्त बैठक घेतली.
यापुढील काळात शेतमालाच्या चोर्‍या झाल्यास नुकसान संबंधित ठेकेदारांच्या बीलातून वजा करण्याचा निर्णय झाला.
चोर्‍या न थांबल्यास वेळप्रसंगी सुरक्षा रक्षक ठेकेदार बदलला जाईल.
तर, संबंधित विभाग प्रमुखांनी, अधिकार्यांनी वचक न ठेवल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय झाला.

  • दिलीप काळभोर, सभापती, बाजार समिती, पुणे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap On Maharashtra Jail Police | लाच घेताना कारागृहाचे तीन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात,
2 महिला कर्मचाऱ्यांचा समावेश