‘दुसऱ्या बाळाबद्दल काय विचार आहे ?’ बेबो करिना म्हणाली..

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची अभिनेत्री करिना कपूर लवकरच आपला आगामी सिनेमा गुड न्यूज मध्ये दिसणार आहे. सध्या करिना प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अनेक ठिकाणी ती मुलाखत देताना दिसत आहे. अशात करिनाला फॅमिली आणि मुलांना घेऊन प्रश्न विचारण्यात आला. यावर तिनं भाष्य केलं. याशिवाय सिनेमातील प्रेग्नंट लेडीचा अनुभव कसा होता, हेही तिनं सांगितलं आहे.

करिनाला विचारण्यात आलं की, दुसऱ्या मुलाबाबत तिचा काय प्लॅन आहे ? यावर करिना म्हणाली, “मी एका मुलातच खुश आहे. देवाची माझ्यावर खूप कृपा आहे. आम्ही यातच खुश आहोत. सध्या फॅमिली एक्स्टेंड करण्याचा आमचा कोणताही प्लॅन नाही. सध्या मी माझ्या कामात बिजी आहे. आम्हाला फॅमिली आणि काम दोघांना बॅलन्स करत चालायचं आहे. मी पूर्ण वेळ माझ्या मुलाला देण्याबाबत विचार करत असते.”

सिनेमातील प्रेग्नंसीचा अनुभव शेअर करताना करिना म्हणते, “या भूमिकेसाठी आम्हाला प्रेग्नंसी स्विमसूट घालायचा होता. हा सगळा प्लॅन ग्राफिक्स कंपनीनं केला होता. जी हे सगळं पहात होती, त्यांनी सिनेमात तीन ट्रायमेस्टरसाठी वेगवेगळे सूट बनवले होते. हे खूप विचित्र वाटतं. परंतु स्क्रिनवर नॅचरल दिसतं. करिनाचा गुड न्यूज हा आगामी सिनेमा 27 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.

View this post on Instagram

MY FAV PERSON 💁🏻❤

A post shared by Kareena Kapoor Khan FC (@kareenakapoorteam) on

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

You might also like