Karisma Kapoor And Abhishek Bachchan | अभिषेकसोबत लग्नासाठी जया बच्चन यांनी करिष्मासमोर ठेवली होती अट

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Karisma Kapoor And Abhishek Bachchan | बॉलिवूड इंडस्ट्रीतले कलाकार आणि कलाकारांचे अफेअर्स हे नेहमी चर्चेचा विषय राहिले आहेत. यातील काही लव्ह-स्टोरी लग्नापर्यंत पोहोचल्या, तर काही नुसत्याच गाजल्या. बॉलिवूडमध्ये अशीच एक प्रेमप्रकरण , ज्यांनी साखरपुडा केला, मात्र लग्नाआधीच त्यांचं नातं संपलं. अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांची ही जोडी होती. या दोघांचं प्रेमप्रकरण चालू होतं. त्यांचा साखरपुडा पार पडलेला आणि दोघं लग्नसुद्धा करणार होते. मात्र नंतर असं काही घडलं की कपूर आणि बच्चन कुटुंबीयांमधील हे नातंच तुटलं. (Karisma Kapoor And Abhishek Bachchan)

 

या घटनेच्या कित्येक वर्षांनंतरही अभिषेक-करिश्माचा साखरपुडा का मोडला, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला.. ? रिपोर्टनुसार करिश्मा यांची आई बबीता यांनी बच्चन कुटुंबियांना या लग्नाबाबत काही अटी ठेवल्या होत्या. त्यात बच्चन कुटुंबाने अभिषेक आणि करिश्मा यांच्या लग्नानंतर अभिषेक यांच्या नावावर काही संपत्ती करावी, कारण करिश्माला भविष्यात कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये. त्यामुळे ही अट मानन्यास बच्चन कुटुंबियांनी साफ नकार दिला होता. (Karisma Kapoor And Abhishek Bachchan)

या गोष्टीमुळं बच्चन आणि कपूर कुटुंबियांमध्ये मोठा वाद झाल्याचं सांगितलं जातं. तसेच जया बच्चन यांनीही या लग्नासाठी कपूर कुटुंबासमोर एक अट ठेवली होती. अभिषेक सोबत लग्न झाल्यावर करिश्मानं बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करणं बंद करावं आणि संपूर्ण वेळ हा अभिषेकसाठी द्यावा, अशी मागणी त्यांनी केल्यानं प्रकरण आणखी किचकट बनलं. कारण ही मागणी करिश्माला मान्य नव्हती, त्यामुळं दोन्ही कुटुंबाच्या परस्पर मागण्यांमुळं हे लग्न होता होता राहिलं. करिश्मा आणि अभिषेक सध्या आपापल्या आयुष्यात मग्न आहेत. अभिषेकने ऐश्वर्या रायशी लग्न केलं. या दोघांना आराध्या ही मुलगी आहे. तर करिश्माने व्यावसायिक संजय कपूरशी लग्न केलं होतं. मात्र 2016 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. करिश्मा आणि संजय यांना दोन मुलं आहेत.

 

Web Title :- Karisma Kapoor And Abhishek Bachchan | jaya bachchans condition for karismas marriage with abhishek is this

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Satyajit Tambe | ‘मी काँग्रेसचाच उमेदवार’, सत्यजीत ताबेंनी सांगितलं अर्ज भरण्यामागचं कारण

Usman Khawaja | ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ फलंदाजाच्या शॉटचा Video व्हायरल; “सूर्यकुमारची स्टाईल मारायला गेला आणि…!”

Kili Paul | प्रसिद्ध रील स्टार किली पॉलला ही रितेश देशमुखच्या ‘वेड लावलंय’ गाण्याची पडली भुरळ, Video केला शेअर