Satyajit Tambe | ‘मी काँग्रेसचाच उमेदवार’, सत्यजीत ताबेंनी सांगितलं अर्ज भरण्यामागचं कारण

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिक पदवीधर मतदारसंघाची (Nashik MLC Election) जागा महाविकास आघाडीकडून काँग्रेसला (Congress) देण्यात आली आहे. काँग्रेसने या जागेवर विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे (MLA Dr. Sudhir Tambe) यांच्या नावाची घोषणा केली. पक्षाने त्यांना एबी फॉर्म ही पाठवला होता. मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेतली आणि मुलगा सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) याचा अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. यानंतर सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरण्यामागचे कारण सांगत आपली भूमिका स्पष्ट केली.

 

प्रसार माध्यमांशी बोलताना सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) म्हणाले, आम्ही काँग्रेस पक्षाकडे मला उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती. पक्षातील अनेकांना मला उमेदवारी मिळावी अशी इच्छा होती. काँग्रेस पक्षाने मात्र निर्णय घेताना डॉ. सुधीर तांबे यांच्या उमेदवारीचा निर्णय घेतला. आज दुपारी त्यांनी हा निर्णय जाहीर केला. त्यामुळे तांत्रिक अडचणी आल्याने मला शेवटच्या क्षणाला अपक्ष (Independent) म्हणून अर्ज भरावा लागला.

 

मी काँग्रेसचा उमेदवार
मी अपक्ष फॉर्म भरताना दोन अर्ज भरले आहेत. एक अर्ज काँग्रेसचा आहे आणि एक अपक्ष म्हणून अर्ज आहे. मात्र माझ्या नावाचा एबी फॉर्म वेळेवर आला नसल्याने मला अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवावी लागेल. परंतु मी काँग्रेसचाच उमेदवार आहे. मी आजपर्यंत काँग्रेसच्या विचारावर काम केल्याचे सत्यजीत तांबे यांनी सांगितले.

भाजपला पाठिंबा मागणार
मी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना भेटणार आहे. मी राष्ट्रवादी (NCP), शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांना भेटणार आहे.तसेच भाजपच्या (BJP) नेत्यांना देखील भेटणार आहे. सर्वांना भेटून विनंती करणार आहे की, राजकीय पक्षाच्या पलिकडे जाऊन सर्वांनी या निवडणुकीत माझ्या पाठिशी उभं रहावं, असं तांबे यांनी यावेळी नमूद केलं.

 

म्हणून बाळासाहेब थोरात आले नाहीत
सत्यजीत तांबे उमेदवारी अर्ज भरताना बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) उपस्थित नव्हते.
यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, बाळासाहेब थोरात यांची तब्येत ठीक नाही.
म्हणून ते आज उमेदवारी अर्ज भरताना सोबत नव्हते.
ते आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) एकाच रुग्णालयात आहेत.
त्यामुळे ते धनंजय मुंडे यांच्या भेटीसाठी गेले आहेत.
ते दोघेही ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) असल्याची माहिती सत्यजीत तांबे यांनी दिली.

 

Web Title :- Satyajit Tambe | satyajeet tambe tell why he become independent candidate from nashik graduate constituency election

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrashekhar Bawankule | सत्यजीत तांबेंना भाजप पाठिंबा देणार?; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…

Devendra Fadanvis | नाशिक पदवीधर निवडणूकीत देवेंद्र फडणवीस यांनीच केला काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम?

Kili Paul | प्रसिद्ध रील स्टार किली पॉलला ही रितेश देशमुखच्या ‘वेड लावलंय’ गाण्याची पडली भुरळ, Video केला शेअर