‘कर्मयोगी’ला साखर निर्यात धोरणाचा देशपातळीवरील दुस-या क्रमांकाचा पुरस्कार

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन (सुधाकर बोराटे) – कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्यास हंगाम २०१८-१९ मधील उत्पादित झालेली साखर केंद्र सरकारच्या निर्यात धोरणानुसार साखर निर्यात केल्याबद्दल देशपातळीवरील दुस-या क्रमांकाचे बक्षीस मिळाले. नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरी लि. नवी दिल्ली यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हा पुरस्कार वितरीत करण्यात आला. काल दि. २८ ऑगस्ट २०१९ रोजी नवी दिल्ली येथील फेडरेशनच्या कार्यक्रमात हा पुरस्कार कारखान्याचे अध्यक्ष व महाराष्ट राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, संचालक भरत सुरेश शहा आणि कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी कारखाना संचालक मंडळ, कारखान्याचे सर्व सभासद व कामगार यांचे वतीने या पुरस्काराचा स्विकार केला.

या पूर्वीही कारखान्यास साखर निर्यातीचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस प्राप्त झालेले आहे. हा हंगाम यशस्वीपणे पार पाडण्याकरिता कारखाना व्यवस्थापनाने हर्षवर्धन पाटील, व्हाईस चेअरमन पद्माताई भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना सर्व ऊस उत्पादक सभासद, ऊस तोडणी कंञाटदार, कामगार, मुकादम, तसेच कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी यांनी उत्तम नियोजन करुन गाळप हंगाम यशस्वीरित्या पार पाडला.

या वर्षी आपले उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. परंतु अद्याप समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे आपले कारखान्यास ऊसाची कमतरता भासणार आहे आणि इतर कारखान्याचे तुलनेमध्ये आपली गाळप क्षमता मोठी असलेने आपल्या कार्यक्षेञातील संपूर्ण ऊसाचे गाळप आपण करणार आहोत. सर्व ऊस उत्पादक सभासद, कारखान्याचे वाहतुकदार, तोडणी मुकादम व सर्व कामगारांचे सहकार्याने येणारा गळीत हंगाम यशस्वी करणेचा मानस आहे.

सदर बक्षिस वितरण कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रो.डॉ. विजय पॉल शर्मा, कमिशन फॉर ऍ़ग्रीकल्चरल कॉस्ट ऍ़ण्ड प्राईसेस, मिनीस्टरी ऑफ ऍ़ग्रीकल्चर, को-ऑप. ऍ़ण्ड फार्मर्स वेल्फेअर भारत सरकार तसेच फेडरेशनचे अध्यक्ष मा.श्री. दिलीप वळसे पाटील, उपाध्यक्ष केतनभाई चिमनभाई पटेल, जयप्रकाश दांडेगांवकर, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ मुंबई, तसेच फेडरेशन नवी दिल्लीचे विद्ममान संचालक मंडळ, कार्यकारी संचालक प्रकाश पी. नाईकनवरे, तसेच राज्याचे सहकारमंञी हर्षवर्धन पाटील संचालक भरत सुरेश शहा आणि कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार या पुरस्कार सोहळयावेळी उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त –