CM येडियुरप्पांनी 3 आठवडयानंतर मंत्रिमंडळ बनवलं, अपक्ष आमदारांनी देखील दिलं महत्वाचं स्थान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याच्या तीन आठवड्यानंतर बीएस येडियुरप्पा यांनी मंगळवारी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. त्यांनी पहिल्याच टप्प्यात माजी मुख्यमंत्री जगदीग शेट्टार, अपक्ष आमदार एच नागेश यांच्यासह 16 इतर आमदारांना मंत्रिमंडळात सहभागी करुन घेतले.

26 जुलैला मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. 29 जुलैला विधानसभेत बहुमत सिद्ध केल्यानंतर वीस दिवस एक सदस्यीय मंत्रिमंडळाबरोबर सरकार चालवल्यानंतर त्यांना 20 ऑगस्टला कॅबिनेट विस्तारासाठी शनिवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याकडून मंजूरी मिळाली. राज्यपाल वजूभाई वाला यांनी मंगळवारी राजभवनात नव्या मंत्र्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली.

येडियुरप्पा यांना मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी बराच ताळमेळ साधावा लागला. काँग्रेस जेडीएसचे अपात्र आमदार ज्यांनी विधानसभेचा राजीनामा दिला त्यावर सर्वोच्च न्यायालयाचा अजून कोणताही निर्णय आलेला नाही.

भाजपाचा स्थिर सरकार देण्याचा दावा –

मुख्यमंत्र्यांना समर्थन देणाऱ्यांना खात्री आहे की राज्यात त्यांच्या पदात देखील वाढ होईल. येडियुरप्पा यांच्या राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार हे राज्यातील राजकीय परिस्थितीत मोठे पाऊल मानले जात आहे. भाजपने राज्यात स्थिर सरकार देणार असल्याचा दावा केला आहे.

विरोधकांकडून आरोप –

काँग्रेसचे कर्नाटकमधील नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आरोप केला आहे की, प्रशासकीय यंत्रणा ढिम्म झाली आहे. विशेष करुन जेव्हापासून राज्यात पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासकीय यंत्रना स्थूल झाली आहे. ही लोकशाही आहे की हुकूमशाही? असा सवाल देखील त्यांनी सरकारला विचारला आहे.

येडियुरप्पा यांच्यावर ढिम्म प्रशासन चालवत असल्याचा आरोप करताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यासाठी येडियुरप्पा यांनी जेवढी घाई केली त्या वेगाने मंत्रिमंडळाचा विस्तार का केला नाही? राज्यातील लोक विविध ठिकाणी असलेल्या ओल्या आणि सुक्या दुष्काळाने संकटात आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –