अरे बापरे ! सभागृहात ‘पॉर्न’ पाहणारा भाजपचा ‘आमदार’ झाला ‘या’ राज्याचा ‘उपमुख्यमंत्री’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सभागृहात पॉर्न पाहण्याचा आरोप असलेला आमदार आता कर्नाटकचा उपमुख्यमंत्री झाला आहे. आमदार लक्ष्मण सावडी यांना मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. कर्नाटकमधील राजकीय नाट्य शमल्यावर आता राज्याच्या नव्या मुख्यमंत्री पदी विराजमान झालेल्या येडियुरप्पा यांनी आमदार डॉ. अश्वत्थ नारायण सी. एन आणि लक्ष्मण सावडी, गोविंद मकथप्पा काराजोल या तीन आमदारांची कर्नाटकच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली आहे.

काय घडला होता प्रकार –
तत्कालीन मंत्री असलेले लक्ष्मण सावडी हे आपल्या मोबाइलवर पॉर्न पाहत होते. तसेच त्यांच्या बाजूला बसलेले महिला बाल कल्याण विकास मंत्री सीसी पाटील लघूशंकेसाठी गेले असताना आमदार सावडी यांनी मोबाइलवर पॉर्न पाहणे सुरू केले होते. त्यानंतर पॉर्न पाहत असल्याचे फुटेज टीव्हीवर दिसल्याने एकच खळबळ उडाली होती. विरोधकांच्या पवित्र्यानंतर या दोन्ही मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

आमदार सावडी यांनी हा दावा फेटाळला होता. ते म्हणाले होते की, महिलेवर चार जण बलात्कार करीत होते. हा व्हिडिओ मी पाहत होतो. रेव्ह पार्टीला आळा घालण्यासाठी तसेच त्यावर बोलण्यासाठी मी तयारी करीत होतो. परंतु, विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर या दोन्ही मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता. 8 फेब्रुवारी 2012 साली लक्ष्मण सावडी हे भर सभागृहात मोबाइलवर पॉर्न पाहत असल्याचे उघडकीस आले होते. यांचे पोर्न पाहत असल्याचे फुटेज देखील व्हायरल झाले होते.

आरोग्यविषयक वृत्त –