काँग्रेसचा अखेरचा बालेकिल्ला भाजपच्या हाती

बंगळूर : वृत्तसंस्था
कर्नाटकात भाजप येणार की, काँग्रेस हा निर्णय आज होत आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. सकाळी ८ वाजता कर्नाटकातील ४० मतदान केंद्रांवर या मतमोजणीला सुरुवात झाली. २२४ पैकी २२२ जागांसाठी १२ मे रोजी येथे मतदान झाले होते. त्यांपैकी आर. आर. नगर येथील गैरप्रकार तर जयनगर मतदारसंघात भाजप उमेदवाराचे निधन झाल्याने या दोन जागांवरील निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. सध्याचा (दुपारी बारापर्यंत) मिळालेलया माहितीनुसार,

भाजप – 111
काँग्रेस – 70
जेडीएस – 39
इतर – 02

कर्नाटक निकालाच्या मिळालेल्या आकडेवारीनुसार भाजप पक्ष आघाडीवर आहे जर ही आकडेवारी असतीच वाढत राहिली तर काँग्रेसचा शेवटचा बालेकिल्ला देखील भाजपच्याच हाती लागेल यात शंका नाही.