कर्नाटकात भाजप ‘IN’, कुमारस्वामी सरकार ‘OUT’ ; १५ ‘बंडखोर’ आमदारांना ‘व्हीप’ लागू होणार नाही

बंगळुरू : वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायालायाने १५ बंडखोर आमदारांच्या याचिकेवर आज निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात सांगितले की, या प्रकरणात संवैधानिक संतुलन ठेवले पाहिजे. विधानसभा अध्यक्ष १५ बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या बेंचने सांगितले की बंडखोर आमदारांना सभागृहाच्या कामकाजात भाग घेण्यासाठी जबरदस्ती केली जाऊ शकत नाही. बंडखोर आमदारांचे वकील मुकुल रोहितगी म्हणाले की, आता बंडखोर आमदारांना पक्षाचा व्हीप आदेश लागू होणार नाही.

रोहितगी म्हणाले की, हे १५ बंडखोर आमदार उद्या गुरुवारी विधानसभेत उपस्थित राहणार नाहीत. उद्या कर्नाटकच्या विधानसभेत कर्नाटक सरकारला बहुमताच्या परीक्षेला सामोरे जावे लागेल. या बहुमताच्या परीक्षेत या १५ बंडखोर आमदारांना मतदानाची सक्ती करता येणार नाही. कर्नाटक विधानसभेची एकूण संख्या २२४ आहे. बहुमतासाठी ११२ जागांची गरज लागते. १५ बंडखोर आमदारांच्या अनुपस्थित कुमारस्वामी सरकारला बहुमत सिद्ध करावे लागेल.

बंडखोर आमदार अनुपस्थितीत राहिल्यास

कर्नाटक विधानसभेत विधानसभा अध्यक्षांना सोडून एकूण संख्या २२३ होते. बहुमतासाठी ११२ आमदारांची गरज भासते. कुमारस्वामी सरकारकडे आता ११६ आमदार आहेत. परंतु १६ बंडखोर आमदारांनी राजीनामा दिला आहे आणि हे आमदार उद्या सभागृहात उपस्थित राहणार नाहीत. यामुळे सभागृहात २०७ सदस्य उपस्थित राहतील. त्यामुळे बहुमत सिद्ध करण्यासाठी कुमारस्वामी सरकारला १०४ सदस्यांची गरज भासेल. परंतु बंडखोर आमदार अनुपस्थित राहिल्यास सरकारच्या पक्षात १०० मते पडतील आणि सरकार ४ मताअभावी पडेल.

 

आरोग्यविषयक वृत्त

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

नैसर्गिक पद्धतीने स्तन सुडौल करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

बिअर पिण्याचे ‘हे’ ८ फायदे, जाणून घ्या

ब्रेस्टची साईज वाढवण्यासाठी ‘या’ नैसर्गिक तेलाचा करा वापर

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

 

Loading...
You might also like