Kartik Aaryan | पेंईग गेस्ट म्हणून सुरुवात आता घेतली मुंबईत आलिशान प्रोपर्टी; अभिनेता कार्तिक आर्यनचे मुंबईमध्ये कोट्यवधींचे घर

पोलीसनामा ऑनलाइन – सध्या बॉक्स ऑफिसवर एक चित्रपट प्रचंड धुमाकूळ घालत आहे तो म्हणजे अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) व अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) यांचा सत्यप्रेम की कथा (Satyaprem Ki Katha). चित्रपटातील अभिनेता कार्तिक आर्यनच्या भूमिकेचे व अभिनयाचे कौतुक सर्वजण करत आहेत. यामध्ये कार्तिकच्या आनंदामध्ये भर पडली आहे. कार्तिकने (Kartik Aaryan) नुकतेच मुंबईमध्ये आलिशान घर घेतले आहे. या घराची किंमत ऐकून आश्चर्याचा धक्काच बसेल. पेइंग गेस्ट म्हणून रहायला आलेल्या कार्तिकने आज स्वबळावर मुंबईमध्ये आलिशान घर घेतले आहे.

अभिनेता कार्तिक आर्यन हा अनेक तरुणींच्या दिल की धडकन बनला आहे. कार्तिकचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाची (Kartik Aaryan Movie) छाप उमटवण्याऱ्या कार्तिकने मुंबईमध्ये करोडो रुपयांची प्रोपर्टी खरेदी केली आहे. त्याने जुहू परिसरातील प्रेसिडेन्सी को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमध्ये एक आलिशान अपार्टमेंट घेतले आहे. (Kartik Aaryan Property) या सोसायटीच्या सिद्धी विनायक ब्लिडिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावर आहे. मीडियाच्या रिपोर्टनुसार या घराची किंमत 17.50 कोटी एवढी आहे. कार्तिकने हे घर स्वतःसाठी घेतले असून हा फ्लॅट 1916 स्क्वेयर फूट आहे. कार्तिकची आई माला यांचे घर ही याच इमारतीत आठव्या मजल्यावर आहे. कार्तिकने नवीन घऱाची 1.05 कोटी रुपये स्टॅंप ड्यूटी भरली आहे. (Kartik Aaryan Home) त्याच्या या आलिशान अपार्टमेंटमध्ये दोन कारसाठी पार्किंगची व्यवस्था आहे.

या आधी कार्तिक शाहिद कपूरच्या (Shahid Kapoor) जुहू तारा रोडवरील प्रणेता अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये भाड्याने राहत होता. शाहिदच्या या फ्सॅटसाठी कार्तिक महिन्याचे 7.5 लाख रुपये भाडे देत होता. त्यानंतर कार्तिकने 2019 मध्ये, वर्सोव्यातील यारी रोडवरील राजकिरण को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये 1.60 कोटी रुपयांना 459 चौरस फुटांचे अपार्टमेंट विकत घेतले होते. आता त्याने मुंबईमध्ये आणखी एक प्रोपर्टीची खरेदी केली आहे.

करिअरच्या सुरुवातीला कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) जेव्हा आपले नशीब आजमवण्यासाठी मुंबईमध्ये (Mumbai) आला होता तेव्हा तो पेइंग गेस्ट म्हणून राहायचा. आता त्याने मेहनतीने मुंबईमध्ये दोन आलिशान कोट्यावधी रुपयांची प्रोपर्टी खरेदी केली आहे. 2011 साली कार्तिकने रोमांटिक कॉमेडी चित्रपट प्यार का पंचनामा (Pyaar Ka Punchnama) यामधून बॉलीवुडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याची घौडदौड आजतागयात सुरु असून त्याने अनेक हिट चित्रपट दिले. कार्तिकची सोनू की टिटू की स्विटी (Sonu Ke Titu Ki Sweety), लुका छुपी (Luka Chuppi), भूल भुलैया 2 (Bhool Bhulaiyaa 2) व आता सत्यप्रेम की कथा या चित्रपटातील भूमिका गाजल्या आहेत.

Web Title :  Kartik Aaryan | kartik aaryan bought a luxury apartment in mumbai amidst the success of satyaprem ki katha know more details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Crime | पुणे जिल्ह्यात खळबळ ! सुप्रिया सुळेंचे निकटवर्तीय माजी नगरसेवकाची जमिनीच्या वादातून कोयता आणि कुऱ्हाडीने हत्या

Pune Police News | फरासखाना पोलिसांकडून मोक्कातील फरार आरोपीला अटक; पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल यांच्याकडून पोलिस अंमलदाराचा सत्कार

Speaker Rahul Narvekar | 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या निर्णयाला लागला वेग; विधानसभा अध्यक्ष आजच नोटीस देण्याची शक्यता

NCP Chief Sharad Pawar | “राष्ट्रवादीत उभी फूट म्हणजे शरद पवारांनी ठरवून केलेला कार्यक्रम”; पवारांच्या जुन्या सहकाऱ्याचा दावा

Pune Crime News | पुणे : ट्रेकला गेलेला तरुण पाण्यात गेला वाहून; मावळमधील कुंडमळ्यातील धक्कादायक घटना

Dr. Pradeep Kurulkar | प्रदीप कुरुलकरांची पाकिस्तानी गुप्तहेराबरोबर क्षेपणास्त्रांविषयी चर्चा; एटीएसच्या दोषारोपपत्रात धक्कादायक उल्लेख

Pune Crime News | पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची 26 वी MPDA ची कारवाई ! विमाननगर परिसरात दहशत माजविणारा गुंड स्थानबद्ध