कार्तिक पौर्णिमा 2019 : ‘या’ वस्तू नक्की करा ‘दान’ होईल विष्णुंची कृपा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कार्तिक पौर्णिमेचे पर्व मंगळवार, 12 नोव्हेंबर रोजी (उद्या) असेल. वर्षातील 12 पौर्णिमांमध्ये कार्तिक पौर्णिमा श्रेष्ठ मानली जाते. असे मानले जाते की गंगा स्नान करणाऱ्यांवर भगवान विष्णुची कृपा होते. कार्तिक पौर्णिमा स्नानाने सर्व प्रकारचे पाप दूर होते. कार्तिक पौर्णिमाला दूध, फळ, खजूर, तांदूळ, तीळ आणि आवळा यांचे दान केले जाते. गंगा सभा विद्वत परिषद आणि कर्मकांड समितीच्या सचिव पंडित अमित शास्त्रींनुसार भारतीय संस्कृतीत पूर्ण तिथी पौर्णिमाला अध्यात्मिक महत्व आहे.

पौर्णिमेच्या दिवशी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. असे म्हणले जाते की भगवान विष्णूने आपला पहिला अवतार मत्स्यच्या स्वरुपात घेतले होते. या दिवशी अखंड दिपदान केल्याने कांतिची देखील प्राप्ति होते. स्नानार्थींना धन, यश आणि कीर्ति एकत्र प्राप्त होते. असे देखील म्हणले जाते की गंगा सारख्या पवित्र नद्यांचे स्थान केल्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी दिपदान आवश्यक करावे.

दिव्याच्या प्रकाशाने दृष्ट वृत्तीचा नाश होतो. स्नानानंतर दिपदान करणं 10 यज्ञांतून मिळणाऱ्या फलप्राप्ती सारखे असते. या उपलक्षाला देवतांनी दिवाळी साजरी केली होती. कार्तिक पौर्णिमेला रात्री देव दिपावली देखील साजरी केली जाते.

Visit : Policenama.com