कात्रजमध्ये हप्ता मागणाऱ्या टोळक्याचा धूडगूस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कात्रज येथील रंगाशेठ चौकातील दुकानदारांना तीन हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी करत टोळक्याकडून दुकाने बंद करण्यात आली. तसेच हातातील कोयते तलवारी बांबू दगड घेऊन मोठमोठ्याने आरडा ओरडा करत टँकर व घराच्या खिडकीच्या काचांची तोडफोड करून दुकान उघडणाऱ्या एकाला कोयत्याने जखमी केले. हा प्रकार एेन भाऊबीजेच्या दिवशी सायंकाळी घडल्याने सणासुदिच्या दिवशी नागरिकांमध्ये चांगलीच दहशत पसरली होती.

याप्रकरणी तुषारं चंद्रकांत चौथवे (वय-३१, रा. सच्चाई माता, आंबेगाव खुर्द, कात्रज, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उमेश बबन वाघचौरे (वय २३ वर्षे रा.दुगड शाळेच्या पाठिमागे सच्चाईमाता आंबेगाव बु.पुणे), सागर शशिराव रसाळ (२१ वर्षे रा. रंगाशेठ चौक सच्चाईमाता ), गणेश मारुती मांगडे (रंगशेठ चौक गणेश नगर सच्चाईमाता आंबेगाव खु पुणे), मयुर, अंड्या व इतर साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कात्रज येथील रंगाशेठ चौकाजवळील, आमिर चिकन सेंटर समोर शुक्रवारी सायंकाळी फिर्यादीच्या परिसरात परिसरात राहणारे गणेश मांगडे, सोहन डांगी, सागर रसाळ, उमेश वाघचौरे, मयुर, अंजया व त्यांचे इतर साथीदार हातामध्ये कोयते, बांबु,दगड घेवून मोठमोठ्याने आरडाओरडा करुन, कोयते व बांबु हवेत फिरवून येणारे जाणारे लोकांना शिवीगाळी करुन दहशत माजवित होते. त्यासोबतच चौकामधील दुकानदांराकडून ३००० रुपयांच्या हप्त्याची मागणी करुन त्यांची दुकाने बंद केली. तसेच त्यावेळी रस्त्याने जाणाऱ्या टॅंकरवर दगडफेक केले. फिर्यादी व त्यांचा भाऊ निलेश चौथवे या दोघांना उमेश वाघचौरे याने ‘दुकान का उघडले असे म्हणत, तुम्ही आम्हाला हफ्ता देत नाही. तु आमचा मित्र बंटी पवारला मारहाण केली होती. तुला आता सोडतच नाही. तुला खल्लासच करतो’ असे मोठयाने म्हणत फिर्यादींना पाठीमागून हाताने दाबून धरले. तर गणेश मांगडे यांने कोयता मारला मात्र त्यांनी तो चुकवल्याने तो कोयता उमेश वाघचौरे याचे डोक्यात लागुन तो जखमी झाला आहे.

त्यानंतर त्यांच्या इतर साथीदारांनी हातातील बांबुने , दगडाने व लाथाबुक्यानीे मारहाण केली. त्यांना मारहाण होत असल्याचे पाहून फिर्यादी यांचा भाऊ निलेश चौथवे, वहिनी, दत्ता व शेजारी राहणारे मित्र भांडणे सोडविण्यासाठी आले त्यावेळी त्यांना देखील बांबुने व लाथाबुक्कयांनी मारहाण केली. तेव्हा फिर्यादी व त्यांन३ भाऊ निलेश पळत जावून घरामध्ये लपून बसले तेव्हा घरावर दगडफेक करून घराच्या खिडकीच्या काचा फोडून दरवाजावर लाथ मारुन शिवीगाळी करुन ” तुम्ही आम्हाला हता का वेत नाही. आज तुम्हाला खल्लासच करणार” अशी धमकी दिली.