Katraj Dairy Playgrounds Reservation | कात्रज डेअरीच्या काही भागावरील मैदानाचे आरक्षण उठविण्यास मनसे, कॉंग्रेस, शिवसेना (ठाकरे) यांच्यासह स्थानीक नागरिकांनी दर्शविला विरोध

आरक्षण उठविण्याच्या प्रस्तावावर सात हरकती दाखल; पाच आरक्षण उठविण्याविरोधात तर दोन बाजूने

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Katraj Dairy Playgrounds Reservation | पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या कात्रज डेअरी च्या जागेवरील मैदानाचे आरक्षण उठवण्यासंदर्भात सात हरकती आणि सुचना प्राप्त झाल्या आहेत. कॉंग्रेस, मनसे आणि शिवसेना ( ठाकरे गट ) यांनी आरक्षण वगळण्यास विरोध केला आहे. संघाने आरक्षण बदलावे असे नमूद केले आहे. तर भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन्ही गट आणि शिवसेना ( शिंदे गट ) यांच्याकडून कोणतीच जाहीर भुमिका घेतली गेली नाही. (Katraj Dairy Playgrounds Reservation )

कात्रज येथील दूध उत्पादक संघाच्या डेअरी च्या सुमारे सात एकर जागेवर महापालिकेच्या विकास आराखड्यात मैदानाचे आरक्षण टाकले आहे. या विकास आराखड्याला राज्य शासनाने २०१७ मध्ये मंजुरी देखील दिली आहे. दरम्यान, पालकमंत्री अजित पवार यांच्या पत्रावरून २०२१ मध्ये मैदानाचे आरक्षण उठवून त्याठिकाणी डेअरी व प्रकल्प हे आरक्षण करून प्राधिकरण म्हणून जिल्हा दूध उत्पादन संघाची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मागील महिन्यांत शहर सुधारणा समितीने आरक्षण बदलासाठी नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यानुसार ५ जानेवारीला जाहीर प्रकटन दिले होते.

या हरकती व सुचना नोंदविण्याची मुदत संपली आहे. मनसेचे वसंत मोरे यांच्यासह ८६६ नागरीकांनी मैदानाचे आरक्षण उठविण्यास विरोध केला आहे. मोरे यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण कायम ठेवावे या मागणीसाठी मानवी साखळी आंदोलन केले गेले होते. मनसे पाठोपाठ कॉंग्रेसने देखील या आरक्षण उठविण्यास विरोध केला आहे. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी हरकत नोंदविली आहे. युवा सेनेचे परेश खांडके, विजयकुमार जाधव, बाळकृष्ण भोसले यांनी आरक्षण उठविण्यास हरकत घेतली आहे. एकीकडे मनसे, कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्याकडून मैदानाचे आरक्षण उठविण्यास विरोध होत असताना, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन्ही गट आणि शिवसेना ( शिंदे गट ) यांच्याकडून कोणतीही हरकत नोंदविली गेली नाही. या भागात भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक आहेत. यापैकी एकानेही आरक्षण उठविण्यास विरोध केला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आरक्षण उठविण्यास अनुकुल असतानाही, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ( शरद पवार गट ) एकाही पदाधिकारी अथवा माजी नगरसेवकाने विरोध केलेला नाही.

महापालिकेकडे मुदतीत सात हरकती आणि सुचना दाखल झाल्या आहेत.
यामध्ये कात्रज दुध संघाचे व्यवस्थापकीय संचालक आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अशा दोन
जणांनी संघाला जागा द्यावी अशी सुचना केली आहे. उर्वरीत हरकती या आरक्षण उठविण्याच्या विरोधात आहे.
यावर लवकर सुनावणी घेतली जाईल.

प्रशांत वाघमारे ( शहर अभियंता )

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Fire News | महंमदवाडी येथील इमारतीच्या 11 व्या मजल्यावर भीषण आग

ACB Trap News | आदिवासी व्यक्तीकडून लाच स्वीकारताना लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात