Katrina Kaif Corona Positive : अक्षय कुमार, विक्की कौशलनंतर आता कतरिना कैफ झाली कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात कोरोनाची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. बॉलीवुड सुद्धा यापासून अलिप्त राहिलेले नाही. अक्षय कुमार, गोविंदा, भूमी पेडणेकर, विक्की कौशल, आलिया भट्टसह अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांना महामारीने गाठले आहे. आता वृत्त आहे की, अभिनेत्री कतरिना कैफ सुद्धा कोविड 19 पॉझिटिव्ह आढळली आहे.

ज्यानंतर तिने स्वत:ला आयसोलेट केले आहे. कॅटने एक पोस्ट शेयर करून म्हटले की, मी कोरोनाच्या सर्व गाईडलाईन्सचे पालन करत आहे. जर तुम्ही सुद्धा माझ्या संपर्कात आला आहात तर आपली टेस्ट करून घ्या. तुमचे प्रेम आणि सहकार्यासाठी धन्यवाद.

दरम्यान, देशभरात सध्या कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढतच चालला आहे.