Katrina Kaif | कतरिनाचा चेहरा बघून चाहते झाले नाराज; म्हणाले कि….

ADV

पोलीसनामा ऑनलाईन टीम : Katrina Kaif | कोण कधी कोणत्या कारणाने ट्रोल होईल याचा काही नेम नाही. सध्या याचाच प्रत्यय दिसून आला. बिग बॉस 16 (Bigg Boss 16) मध्ये ‘फोन भूत’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली होती. सध्या कॅटरिना कैफ (Katrina Kaif) ‘फोन भूत’ (Phone Bhoot) या सिनेमाच्या प्रमोशन मध्ये बिझी असल्याचे दिसून येत आहे. मात्र ती जेव्हा बिग बॉस 16 मध्ये दाखल झाली तेव्हा तिला पाहून आणि तिचा लुक पाहून चाहते हक्का बक्का झाले होते.

ADV

यावेळी कॅटरिनाने (Katrina Kaif) सलमान खान (Salman Khan) सोबत स्टेज शेअर करत खूप धमाल केली होती. पिवळ्या रंगाच्या बॉडीगॉन ड्रेसमध्ये कॅटरिना उपस्थित होती. मात्र तिचा हा लूक चाहतांना फारसा काही आवडला नसल्याचे दिसून आले. तिच्या या लुक नंतर आता चाहत्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

काही चाहत्यांनी तर तिचा चक्क जुना आणि आत्ताचा फोटो शेअर करत तिला ट्रोल केला आहे. यामध्ये खूप साऱ्या युजर्सनी अनेक साऱ्या कमेंट देखील केल्या आहेत. काहींनी तिला “प्लास्टिक सर्जरी (Plastic Surgery) करून तुझ्या सुंदर चेहऱ्याची तू वाट लावलीस, असे का केले?” असा प्रश्न उपस्थित केला.

तर काहींनी केमिकल चा वापर करून तिने चेहऱ्याची वाट लावली असून ती आता जास्तच वयस्कर दिसत असल्याचे म्हटले आहे. 4 नोव्हेंबरला ‘फोन भूत’ हा चित्रपट (Phone Bhoot Movie) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट कॉमेडी हॉरर असून यात कॅटरीना ने भुताची भूमिका साकारली आहे. आता बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट किती गाजेल हे मात्र पहावेच लागेल.

 

Web Title :- Katrina Kaif | katrina kaif undergo botox or plastic surgery puffed face looks in bigg boss 16

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

IND Vs BAN Weather Report | एडिलेडमध्ये भारत वि. बांग्लादेश मॅच होणार? कसं असेल आजचे हवामान

Bharat Jodo Yatra | काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रातील बड्या नेत्याला धक्काबुक्की, चेहऱ्याचा भाग फॅक्चर

Pune Crime | फ्लॅट नावावर करण्यासाठी ८३ वर्षाच्या आईला मुलीने मारहाण करुन हात केला फॅक्चर, हडपसर परीसरातील घटना