जेव्हा बंद खोलीत ‘या’ अभिनेत्याला Kiss करत होती कॅटरीना कैफ, ‘बिग बी’ अमिताभनं पकडलं होतं रेड हँड !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार कॅटरीना कैफनं 2003 साली आलेल्या बूम या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. या सिनेमात बिग बी अमिताभही होते. यात गुलशन ग्रोवर आणि कॅटरीना यांचा लिपलॉक किसिंग सीन आहे. कैजाद गुस्ताद डायरेक्टेड हा सिनेमा बोल्ड कंटेटमुळं खूप चर्चेत राहिला होता. यातील गुलशन आणि कॅट यांच्या लिपलॉकचा एक किस्सा आज आपण जाणून घेणार आहोत.

गुलशन ग्रोवर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, या सीनवेळी ते खूप नर्व्हस होते आणि बंद खोलीत त्यांनी कॅटरीनासोबत अनेकदा स्मूच करण्याचा सराव केला होता.

गुलशन यांनी सांगितलं होतं की, एकदा एका बंद खोलीत ते स्मूच करण्याची प्रॅक्टीस करत होते. यावेळी अचानक तिथं बिग बी अमिताभ बच्चन आले होते. त्यांनी सारं काही पाहिलं होतं. त्यांनीच आम्हाला चिअर केलं होतं. हा सीन माझ्या करिअरमधील सर्वात कठिण सीन होता. हा सीन शुट करण्यासाठी 2 तास लागले होते. याचं शुटींग दुबईतील बुर्ज अल अरब या हॉटेलमध्ये झालं होतं.

View this post on Instagram

#katrinakaif #boom #throwback2003 #boommovie

A post shared by Katrina | Kaif (@katrinakobsessed) on

गुलशन पुढे म्हणाले, डायेरक्टरनं कॅटरीनाला सांगितलं होतं की, टेबलवर बसून माझी कॉलर पकडून मला किस करायचं आहे. हे ऐकल्यावर मी खूप शॉक झालो होतो. परंतु कॅटरीनानं पूर्ण कॉन्फिडंसनं हा सीन पूर्ण केला होता.

कॅटरीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायाचं झालं तर लवकरच ती सूर्यवंशी सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा 24 मार्च 2020 रोजी रिलीज होणार होता. परंतु कोरोनामुळं सिनेमाची रिलीज डेट टाळण्यात आली आहे. या सिनेमात ती अक्षय कुमार सोबत दिसणार आहे. या सिनेमाच्या निमित्तानं ती रोहित शेट्टीसोबत ती पहिल्यांदाच काम करत आहे. याशिवाय तिनं डायरेक्टर विकास बहलचा डेडली हा सिनेमा साईन केल्याचंही बोललं जात आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like