Katrina Kaif | पहिल्याच शॉर्टनंतर काढले होते बाहेर; कतरिनाने नंतर घडवले यशस्वी बॉलीवूड करिअर

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडच्या यशस्वी अभिनेत्रींपैकी एक असलेली अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) हिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. कतरिनाचा मोठा चाहता वर्ग असून तिचे चाहते हे तिच्या आगामी चित्रपटाची प्रतिक्षा करत असतात. पण सुरुवातीच्या काळात अभिनेत्री कतरिनाला एक चित्रपट मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला होता. (Katrina Kaif Struggle Period) अगदी तिला पहिल्याच शॉर्ट नंतर बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. ती कधीच अभिनेत्री होऊ शकत नाही असं म्हणणाऱ्याची तोंडे कतरिनाने (Katrina Kaif) तिच्या य़शाने बंद करुन दाखवली आहे.

 

 

 

 

अभिनेत्री कतरिना ही आधी मॉडेलिंगच्या क्षेत्रामध्ये कार्यरत होती. त्यानंतर तिने बॉलीवुडमध्ये (Bollywood News) करिअर करण्याचे ठरवले. मात्र तिला महत्त्वाचे म्हणजे हिंदी भाषा येत नव्हती. पहिला चित्रपट मिळवण्यासाठी तिला अथक प्रयत्न करावे लागले आहे. कतरिनाने एका मुलाखतीमध्ये तिचा स्ट्रगलिंग पिरियड बद्दल सांगितले होते. कतरिनाने सांगितले की तिला ऑडिशनमध्येच नाकारले जायचे. (Katrina Kaif Photo) आणि त्यानंतर खूप प्रयत्नांती एका चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली तर तिला पहिल्याच शॉर्टनंतर बाहेर काढण्यात आले. फक्त एवढेच नाही तर तू कधीच अभिनेत्री होऊ शकत नाही असे देखील कतरिनाला बोलण्यात आले होते. आज मात्र ती बॉलीवुडमधील यशस्वी अभिनेत्री बनली आहे. तिने स्वत: मध्ये अनेक बदल केले. मेहनतीने तिची हक्काची जागा तयार केली आहे. पण पहिल्या चित्रपटावेळी कतरिनाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते.

 

 

 

अभिनेत्री कतरिना कैफने बूम या चित्रपटामधून बॉलीवुडमध्ये पदार्पण (Katrina Kaif Bollywood Debut) केले. यामध्ये तिने अभिनेता गुलशन गोव्हर (Gulshan Grover) सोबत काम केले. मात्र पहिल्याच चित्रपटामध्ये तिला इंटिमेट सीन (Katrina Kaif Intimate Scene) द्यावे लागले.  कतरिनाने पहिल्या सिनेमामध्ये गुलशन सोबत किसिंग सीन (Katrina Kaif Kissing Scene) दिला होता. मात्र चित्रपट सुपर फ्लॉप ठरला. कतरिना पुढच्या अडचणींमध्ये वाढ होत होती. तिला भाषेची खूप समस्या येत होती. मात्र त्यानंतर 2005 साली कतरिनाने सलमान खान (Salman Khan) सोबत चित्रपटविश्वात नव्याने एंट्री घेतली. तिने सलमान सोबत ‘मैने प्यार क्यू किया’ (Maine Pyaar Kyun Kiya) या चित्रपटामध्ये स्क्रीन शेअर केली. कतरिनाला हा पहिलाच चित्रपट चांगला मिळाला होता ज्यामध्ये तिची भूमिका चांगली होती.

 

 

त्यानंतर अभिनेत्री कतरिना कैफने कधीच मागे वळून पाहिले नाही. कतरिनाने एका मागून एक हिट चित्रपट दिले. तिची सलमान खान (Katrina And Salman)  सोबतची जोडी खूप गाजली. कतरिनाने आपल्या अभिनय कौशल्य व नृत्यकौशल्याच्या बळावर या इंडस्ट्रीमध्ये स्थान निर्माण केले. तिच्या भाषेमध्ये तिने बदल केला. मेहनतीचे योग्य फळ कतरिनाला (Katrina Kaif Upcoming Movie) मिळाले आहे.  अभिनेत्री कतरिना कैफ हिचा ‘मेरी क्रिसमस’ (Merry Christmas) व सलमान सोबत ‘टायगर 3’ (Tiger 3) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

 

 

Web Title :  Katrina Kaif | when katrina kaif was dropped from the debut film after two days of shooting

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Shilpa Shetty | या वयातही शिल्पा शेट्टी करत आहे जबरदस्त फिगर फ्लॉन्ट; सौंदर्य पाहून नेटकरी घायाळ

Vijay Deverakonda | गाण्यातील रोमॅंटिक सीन आहेत विजय देवरकोंडाच्या आयुष्यातील खरे अनुभव; लग्नाबद्दल दिली अपडेट

Sara Ali Khan | सारा अली खानला ‘ही’ मस्ती भोवली होती; शाळेतून सस्पेंट करण्याची आली होती वेळ