Vijay Deverakonda | गाण्यातील रोमॅंटिक सीन आहेत विजय देवरकोंडाच्या आयुष्यातील खरे अनुभव; लग्नाबद्दल दिली अपडेट

पोलीसनामा ऑनलाइन – दाक्षिणात्य एक कपल असे आहे ज्यांची चर्चा आणि चाहते देशभर आहे. असे सुप्रसिद्ध कपल म्हणजे अभिनेत्री विजय देवरकोंडा व अभिनेत्री रश्मिका मंदाना. (Vijay Deverakonda ) विजय आणि रश्मिका (Rashmika Mandana) हे दोघे दाक्षिणात्य सिनेविश्वाशी निगडित असले तरी त्यांनी आता बॉलीवुडमध्येही दमदार एंट्री केली आहे. रश्मिका व विजयची ऑन स्क्रीन जोडी व रिअल लाईफ जोडी प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली आहे. या कपलचा (Vijay Deverakonda ) चाहता वर्ग मोठा असून त्यांच्या लग्नाची सर्वजण वाट पाहत आहेत.

 

 

 

अभिनेता विजय देवरकोंडा व अभिनेत्री रश्मिका मंदाना (Vijay And Rashmika) हे अनेकदा क्वालिटी टाईम एकत्र घालवताना दिसतात. त्यांचे एकत्र व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात मात्र अद्याप दोघांनी आपल्या प्रेमाची कबुली दिलेली नाही. विजय व रश्मिका (Vijay And Rashmika Affair) हे त्यांच्या कामावर लक्ष देताना दिसत आहे. अभिनेता विजय हा अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) सोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. त्यांचा ‘खुशी’ चित्रपट (Khushi Movie)प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या ‘खुशी’ चित्रपटातील रोमॅंटिक गाणे रिलिज झाले आहे. या गाण्यामध्ये विजय व समंथा (Vijay And Samantha) ऑन स्क्रीन रोमांस करताना दिसत आहे. याबद्दल विचारले असता विजयने त्याच्या खऱ्या आयुष्यातील लग्नाबद्दल अपेक्षा सांगितल्या आहेत.

 

मुलाखती दरम्यान विजयला खुशी मधील गाण्यातील रोमांसबद्दल विचारण्यात आले तर तो म्हणाला की, “या गाण्यातील अनेक सीन्स हे माझ्या खऱ्या आयुष्याशी निगडीत आहेत. मला मिळालेले अनुभव यामध्ये आहेत. माझे लग्न झालेले नाही पण जेव्हा केव्हा माझे लग्न होईल तेव्हा मला असेच वैवाहिक आयुष्य हवे आहे.” असे विजयने सांगितले. अभिनेता विजय देवगकोंडा व रश्मिका (Vijay Deverakonda And Rashmika Mandana) सध्या यशाच्या शिखरावर आहे. ते आपापल्या कामांकडे लक्ष देताना दिसतात. तरी या व्यस्त कामकाजामध्ये विजय व रश्मिका (Rashmika Mandana Boyfriend) एकत्र असलेले दिसून येतात. मध्यंतरी त्यांची फॅमिली सोबत डिनर डेटवर गेलेली व्हिडिओ व्हायरल झाली होता. तेव्हापासून ते लवकरच लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे.

 

 

Web Title : Vijay Deverakonda | vijay deverakonda talks about marriage amid rashmika mandanna dating rumours
said when i get married this is how i would like to see

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा