Coronavirus : भारताने उचलले ‘हे’ पाऊल तर जगात आणखी ‘विनाश’ घडवतील कोरोनाचे ’सुपर व्हेरिएंट्स’, शास्त्रज्ञांचा इशारा

नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या बिघडत चाललेल्या स्थितीचा परिणाम आता आफ्रिकन देशांवर सुद्धा दिसू लागला आहे. कोरोनाच्या विध्वंसाला नियंत्रित करण्यासाठी भारताने व्हॅक्सीन निर्यातीवर बंदी आणली आहे, ज्यामुळे आफ्रिकन राष्ट्र संकटाचा सामना करत आहेत. केनियाच्या एका टॉप सायंटिस्टने याबाबत संपूर्ण जगाला इशारा दिला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, आफ्रिकन देशांमध्ये व्हॅक्सीनच्या कमतरतेमुळे संसर्गाचा धोका जास्त होईल आणि संपूर्ण जगात कोरोनाचे सुपर व्हेरिएंट्स पसरतील.

केनिया आता पूर्णपणे ’कोव्हॅक्स’वर अवलंबून आहे. या जागतिक संघटनेचा उद्देश सर्व देशांना समान व्हॅक्सीन उपलब्ध करून देणे आहे. कोव्हॅक्समुळेच आफ्रिकन देशांना कोविशील्डचे लाखो डोस मिळाले होते. हे एस्ट्राजेनेका व्हॅक्सीनचे तेच व्हर्जन आहे, ज्याची निर्मिती भारतात सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाने केली आहे. केनियाने आतापर्यंत मिळालेल्या जवळपास सर्व व्हॅक्सीनचा वापर केला आहे आणि भारताने व्हॅक्सीन निर्यातीवर बंदी आणल्यानंतर येथे व्हॅक्सीनेशन कार्यक्रम ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.

वर्ल्ड डेटानुसार, केनियाच्या दोन टक्के लोकसंख्येलाच आतापर्यंत कोविड-19 व्हॅक्सीनचा सिंगल डोस मिळू शकला आहे. कोव्हॅक्स अंतर्गत जूनमध्ये होणार्‍या डिलिव्हरीबाबत सुद्धा आता शंका आहे. केनियाची लोकसंख्या खुप कमी आहे. तरीही दोन टक्के पेक्षा कमी लोकांना व्हॅक्सीनचा सिंगल डोस मिळणे चिंतेचा विषय आहे. मात्र ही आफ्रिकेच्या व्हॅक्सीनेट झालेल्या लोकसंख्येपेक्षा खुप जास्त आहे. म्हणजे आफ्रिकेच्या इतर देशांमध्ये स्थिती आणखी वाईट आहे.

लॅन्सेट ग्रुप लॅबोरेट्रीजचे फाउंडिंग पार्टनर आणि पॅथोलॉजिस्ट डॉ. अहमद कलेबी यांनी चिंता व्यक्त करताना म्हटले की, अशा स्थितीत काहीच करण्यात आले नाही तर याचे परिणाम खुप वाईट होतील. त्यांनी श्रीमंत देशांना सुद्धा विनंती केली की, त्यांनी आपल्या व्हॅक्सीनेशन धोरणांवर पुन्हा एकदा विचार करावा. कारण आता ते जास्त जोखीम असलेल्या गटांना व्हॅक्सीनेट करण्यासाठी पुढे जात आहेत, ज्यामध्ये मुले आणि तरूणांचा समावेश आहे.

फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एफडीए) ची परवानगी मिळाल्यानंतर युएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शन (सीडीसी) ने 12 ते 15 वर्षाच्या मुलांना फायजर-बायोटेकची व्हॅक्सीन देण्याची शिफारस केली आहे. यावर कलेबी यांनी म्हटले आहे की, सध्याची स्थिती पाहता टीनएजर्सला व्हॅक्सीनेट करणे समजण्याच्या पलिकडे आहे. संपूर्ण जगात गंभीर प्रकारे आजारी असलेले लोक आणि सुपर स्प्रेडर्सला सुद्धा अजूनपर्यंत व्हॅक्सीन मिळू शकलेली नाही.

डॉ. कलेबी यांनी इशारा देताना म्हटले की, व्हॅक्सीनच्या या संकटामुळे नवीन सुपर व्हेरिएंट्स निर्माण होण्याची शक्यता आहे. जोपर्यंत आपण सर्व लोक सुरक्षित होत नाही तोपर्यंत कुणीही सुरक्षित राहणार नाही.