केरळमध्ये ई. श्रीधरन यांच्या रूपाने भाजपला आशेचा किरण

तिरुवनंतपुरम : पोलीसनामा ऑनलाइन – डाव्या आघाडीचे वर्चस्व असलेल्या केरळमध्ये अखेर भाजपला आशेचा किरण दिसत आहेत. देशामध्ये मेट्रोमॅन म्हणून नाव मिळवलेले ई. श्रीधरन यांनी पलक्कड मतदारसंघातून आघाडी घेतली आहे. उर्वरित ठिकाणी भाजप पिछाडीवर आहे. दरम्यान मुख्यमंत्री पदाचे उमेदवार ई. श्रीधरन यांना घोषित केल्यानंतर निवडणुकीत भाजपनेचांगलीच कंबर कसली होती.
आतापर्यंत पलक्कड मतदारसंघाच्या झालेल्या मतमोजणीत भाजपाचे ई. श्रीधरन यांना १० हजार ५५ मते मिळाली आहेत. तर काँग्रेसचे शफी पराम्बिल यांना ५ हजार ७२२ मते मिळाली आहेत. डाव्या पक्षांचे उमेदवार सी. पी. प्रमोद यांना ३ हजार ९६२ मते मिळाली आहेत. एकूण ५०.३६ टक्के मते ही ई. श्रीधरन यांना मिळाली आहेत.

दरम्यान, पी. विजयन यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफ या डाव्या आघाडीने ९२ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे केरळमध्ये पुन्हा एकदा डाव्या पक्षांची सत्ता येताना दिसत आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफने ४५ जागांवर आघाडी घेतली आहे. तर २ जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर एका जागेवर इतर उमेदवार आघाडीवर आहे.

केरळ विधानसभेच्या १४० जागा असून बहुमतासाठी ७१ जागा मिळवणे आवश्यक आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत डाव्या पक्षांनी बहुमताचा आकडा ओलांडला आहे. केरळमध्ये प्रत्येकवेळी सत्तातर होत असते मात्र कित्येक वर्षांनी एकच पक्ष आपली सत्ता राखताना दिसत आहे.