केरळमध्ये नमाज ‘पठण’ करताना भाजपच्या सेक्रेटरीवर हल्ला, प्रकृती ‘गंभीर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) बाबत आयोजित कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर थोड्या वेळानं भाजपाचे प्रदेश सचिव एके नजीर यांच्यावर इडुक्की जिल्ह्यातील नेदुंगंदम येथील एका मशिदीत कथितपणे हल्ला करण्यात आला. भाजपाने ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ (एसडीपीआय) आणि माकपा समर्थक ‘डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया’ (डिवायएफआय) च्या कार्यकर्त्यांवर हल्ल्याचा आरोप लावला आहे.

इमामने दिली नमाज पढण्यास अनुमती
पोलिसांचे म्हणणे आहे की, ही घटना मशिदीच्या आत घडल्यामुळे हे स्पष्ट सांगणे कठीण आहे की नजीर यांच्यावर हल्ला कोणी केला. जन जागृती बैठकीला हजेरी लावल्यानंतर थुकुप्पलम जामा मशिदीत नमाज पढण्यासाठी गेले असता नजीर यांना काही लोकांनी येण्यापासून रोखले, पण इमामने त्यांना नमाज पढण्यासाठी परवानगी दिली. यानंतर ते नमाज पढण्यासाठी गेले.

दवाखान्यात भरती करण्यात आले
भाजपने एका पत्रकार परिषदेत सांगितले की, “नमाज पढताना नवाज यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली गेली.” नजीर यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यानंतर त्यांना कोचीच्या अमृता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.

हल्ला करणाऱ्यांबद्दल काहीही माहिती मिळाली नाही
कट्टाप्पनाचे पोलीस उपअधीक्षक एनसी राजमोहन यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, जाहीर सभेचा एक भाग म्हणून भाजपाने एक रॅली काढली होती, तिथे डीवायएफआयच्या तीन कार्यकर्त्यांनी काही अडचणी निर्माण केल्या. तसेच त्यांनी सांगतले की मशिदीच्या आत हल्ला झाल्यामुळे याचा तपास करता आला नाही की या हल्ल्यात नेमकं कोण सामील होते. परंतु पोलीस याचा तपास करत असून लवकरच या प्रकरणाचा खुलासा करण्यात येईल.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/