#Video : पंतप्रधान मोदींनी केरळच्या ‘या’ मंदिरात केले ‘डिजिटल पेमेंट’ने ‘दान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळ दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी गुरुवायुर मंदिराला भेट देऊन आशिर्वाद घेतले. एवढेच नाही तर त्यांनी या मंदिरात डिजिटल पेमेंट पद्धतीने पैसे देखील दान केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी 39 हजार 421 रुपये दक्षिणा म्हणून दान केले. तेही डिजिटल पेमेंट स्वरूपात.

पंतप्रधान मोंदीनी आज केरळ दौऱ्यावर असताना त्रिसुर येथील प्रसिद्ध गुरुवायुर मंदिरात श्रीकृष्णाची पूजा केली. प्राचीन परंपरेनुसार भक्त आपल्या वजनाच्या बरोबरीने वस्तू आराध्याला चढवण्याची परंपरा आहे. यासाठी पंतप्रधान मोदीचे वजन करण्यासाठी मंदिर प्रशासनाने कमळाची फुले मागवली होती. यावेळी पंतप्रधान मोदी दक्षिणेतील वेशभूषेत पाहायला मिळाले. त्यांनी मंदिरात विधीवत पूजा देखील केली.

मंदिरात पूजा केल्यानंतर मोदींनी रँलीला देखील संबोधित केले. यावेळी त्यांनी गुरुवायुर याच्या स्पर्शाने पावण भूमित आपल्याला यायला मिळाले हे सौभाग्य आहे असे सांगितले. मंदिरात दर्शन घेऊन मला नवी उर्जा मिळाल्याचे देखील त्यांना सांगितले. यावेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानत लोकशाहीच्या उत्साहात योगदान दिल्याने केरळवासीयांचे आभार मानले.

या आधी देखील पंतप्रधान मोदींनी केरळच्या दौऱ्यात या मंदिराला भेट दिली होती, ज्यावेळी ते दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री झाले होते.