Khadakwasla Irrigation Department | खडकवासाला पाटबंधारे विभागाचा कारभार तुटपुंज्या मनुष्यबळावर; 50 टक्के पदे रिक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खडकवासाला पाटबंधारे विभागात (Khadakwasla Irrigation Department) मागील काही वर्षापासून सरासरी 50 टक्के पदे रिक्त (Vacancies) आहेत. त्यामुळे सध्या अत्यंत तुटपुंज्या मनुष्यबळावर खडकवासला पाटबंधारे विभागाचा (Khadakwasla Irrigation Department) कारभार सुरु आहे. विभागातील तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील 70 टक्क्यांपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यक्षेत्र लोणी काळभोर (Loni Kalbhor) पर्यंत 45 किमी आहे.

मागील अनेक वर्षापासून खडकवासला पाटबंधारे विभागात रिक्त पदांवर भरती झालेली नाही. एकूण 354 मंजूर पदांपैकी 172 पदे रिक्त आहेत. याशिवाय 2009 पासून अनुकंपा (Compassion) तत्वानुसार नोकर भरती झाली नसल्याने अनेक उमेदवार भरतीच्या प्रतिक्षेत आहेत. यादीमधील अनेक उमेदवारांचे वय 45 पेक्षा अधिक झाल्याने ते नोकरी न लागताच अपात्र झाले आहेत. तर काहीजण अपात्र होण्याच्या जवळ आहेत. त्यामुळे अनुकंपा तत्वानुसार भरती प्रक्रिया (Recruitment process) सुरु करावी अशी मागणी होत आहे. परिणामी सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागत आहे. (Khadakwasla Irrigation Department)

पदाचे नाव – मंजूर पदसंख्या – भरलेली संख्या – रिक्त पदसंख्या

प्रथम लिपीक – 1 -1 – 0

सहाय्यक आरेखक – 1-1-0

स्थापत्य अभियंता सहाय्यक – 27-25-2

भांडारपाल-1-1-0

वरिष्ठ लिपीक-14-13-1

वरिष्ठ दफ्तर कारकून- 1-0-1

अनुरेखक-10-6-4

कनिष्ठ लिपिक-34-26-8

वाहन चालक-10-4-6

सहाय्यक भांडारपाल-1-1-0

दफ्तर कारकून -55-45-10

कालवा निरीक्षक-120-36-84

एकूण -354-182-172

Web Title :- Khadakwasla Irrigation Department | Khadakwasala Irrigation Department in charge of insufficient manpower; 50 percent vacancies

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Udayanraje Bhosale | आता नगरपालिका निवडणुकीत उदयनराजे अन् शिवेंद्रराजेंना एकाचवेळी परभूत करण्याची राष्ट्रवादीची ‘रणनिती’

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 185 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Maharashtra Rains | राज्यात जोरदार पावसाची शक्यता ! आजपासून 3 ऑक्टोबरपर्यंत ‘या’ 6 राज्यांमध्ये होणार जोरदार पाऊस, हवामान विभागाचा इशारा