मोठी दुर्घटना : शाळेची भिंत कोसळल्याने 6 लोकांचा मृत्यू; रेस्क्यू ऑपरेशन जारी

खागडिया : पोलीसनामा ऑनलाइन –  बिहारच्या खागडियामध्ये शाळेची भिंत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. तर तीन अन्य लोक मलब्याखाली दबले गेल्याची शंका आहे. ही दुर्घटना खगडियाच्या महेशखुंटमधील चंडी टोला गावात घडली आहे. दुर्घटनेत सहा मजूरांचा मृत्यू झाला आहे तर एक मुलगा गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच खगडियाचे प्रभारी डीएम शत्रुंजय मिश्रा, गोगरी मंडलचे एसडीओ सुभाष चंद्र मंडल, डीएसपी, पोलीस ठाण्याचे सर्व प्रमुख अधिकारी घटनास्थळी पोहचले होते. या दुर्घटनेबाबत प्रभारी डीएमने म्हटले की, भिंत कोसळल्यामुळे सहा मजूरांचा मृत्यू झाला तर तीन दबले गेल्याची शंका आहे. सध्या दोन जेसीबी मशीन्सने मलबा हटवला जात आहे. तपासानंतर दोषींविरूद्ध कारवाई केली जाईल असेही त्यांनी म्हटले. या दुर्घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

या दुर्घटनेनंतर मोठ्या संख्येने लोक घटनास्थळी जमले होते. माहिती मिळाल्यानंतर जिल्ह्यातील अधिकार्‍यांनी सूत्र ताब्यात घेतली. बन्नी पंचायतीच्या हायस्कूलची भिंत कोसळल्याने ही दुर्घटना घडली. दुर्घटनेच्या वेळी अनेक मजूर काम करत होते आणि अचानक भिंत कोसळली. यामध्ये आतापर्यंत सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. हे काम बिहार सरकारच्या नळ पाणी योजनेंतर्गंत सुरू होते.

या दुर्घटनेनंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. तसेच, या दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना नोकरी आणि नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी रस्ता रोको सुद्धा केला. मृतांच्या नातेवाईकांसह ग्रामस्थ महेशखुंटच्या चैधाबन्नीजवळ आंदोलन करत आहेत.