Kiara Advani | कार्तिकसोबतच्या फोटोमुळे कियारा ट्रोल; ‘सिद्दार्थबरोबर घटस्फोट कधी घेतला? नेटकऱ्यांचा सवाल

पोलीसनामा ऑनलाइन – Kiara Advani | अभिनेत्री कियारा अडवाणी ही कायम तिच्या लुकमुळे चर्चेत असते. कियारा सोशल मीडियावर खूप एक्टिव असते मात्र तिने पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे ती आता ट्रोल होत आहे. कियारा (Kiara Advani) लवकरच ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटात झळकणार असून यामध्ये ती अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) सोबत स्क्रिन शेअर करणार आहे. कियाराने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन कार्तिकसोबत चित्रपटातील एक फोटो पोस्ट केल्यामुळे तिच्यावर टीका केली जात आहे.

येत्या 29 जूनला कियारा आणि कार्तिकचा नवा कोरा चित्रपट ‘सत्यप्रेम की कथा’ (Satyaprem Ki Katha) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटातील गाणी या आधीच रिलिज झाली असून या गाण्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या कार्तिक आणि कियारा दिसून येतात. दरम्यान कियाराने आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाउंटवरुन “आज के बाद तू मेरी रहना” या गाण्यादरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये दोघेही लग्नबंधनात अडकलेले दिसत असून कार्तिक आणि कियारा हसून पोझ देत आहेत.

मात्र कियाराच्या चाहत्यांना व नेटकऱ्यांना हा फोटो आवडलेला नसून यामुळे कियाराला ट्रोल केले जात आहे. या ट्रोलिंगमागचे महत्त्वाचे कारण म्हणजे कियारा आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Actor Siddharth Malhotra) काही महिन्यांपूर्वी लग्नबंधनात अडकले. सिद्धार्थ आणि कियाराचे (Siddharth And Kiara Wedding) लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामध्ये कियाराने पिंक लेंहेंगा स्टाईल केला होता. आता कियाराने पोस्ट केलेल्या या चित्रपटातील फोटोमध्येही कियाराने आपल्या खऱ्या वेटिंग लुक प्रमाणे स्टाईल केली असून कार्तिकही सिद्धार्थशी मिळत्या जुळत्या कपड्यांमध्ये दिसत आहे.

कियाराने (Kiara Advani) पोस्ट केलेल्या फोटोची पोझही सिद्धार्थ सोबत लग्नात काढलेल्या फोटोप्रमाणेच आहे. त्यामुळे ट्रोलर्सने कियाराला निशाणा साधला आहे.

नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत ‘सिद्धार्थ आणि तुझ्या खऱ्या लग्नातील पोज तुम्ही चित्रपटात जशीच्या तशी का रिक्रिएट केली?’ तर दुसऱ्या युजरने कमेंट केली आहे की, ‘मी सिद्धार्थ मल्होत्रा असतो, तर हे सहन केले नसते.’ आणखी एकाने लिहीले आहे की ‘कियाराने सिद्दार्थबरोबर घटस्फोट कधी घेतला?’असे प्रश्न विचारले जात आहे.

या निगेटिव्ह कमेंटमुळे अभिनेत्री कियारा अडवाणीने इन्स्टाग्रामवरून कार्तिक आर्यनबरोबरचा लग्नबंधनात अडकलेला चित्रपटातील तो फोटो डिलीट केला. मात्र कार्तिक आर्यनच्या अकाउंटवर हा फोटो अजून आहे.

‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट या महिन्याच्या शेवटी 29 जून ला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
आधी चित्रपटाचे नाव ‘सत्यनारायण की कथा’ असे होते, पण काही कारणास्तव यात बदल करुन ‘सत्यप्रेम की कथा’
असे नाव ठेवण्यात आले. कार्तिक-कियारासह या चित्रपटात गजराज राव (Gajraj Rao) आणि सुप्रिया पाठक
(Supriya Pathak) महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. (Kiara Advani And Kartik Aaryan)

Web Title :  Kiara Advani | kiara advani wedding pose with kartik aaryan sparks new controversy actress delete post from instagram

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mula Mutha Riverfront Development | होय, हे परदेशातील नव्हे तर हे आहे आपल्या मुळा-मुठाचे बदलणारे सौंदर्य (PHOTOS)

Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्ते खेळताना झालेल्या भांडणातून एकाचा खून

ACB Trap On Talathi News | 50 हजाराची लाच घेताना सराईत लाचखोर तलाठ्यास अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक