Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्ते खेळताना झालेल्या भांडणातून एकाचा खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्ते खेळताना झालेल्या भांडणातून एकाने तिघांवर चाकूने सपासप वार केले. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी मध्यरात्री देहूरोड परिसरातील लक्ष्मीपुरा (Laxmipura Dehuraod) येथे घडली आहे (Murder In Pimpri) . ते सर्वजण बांधकाम मजुर असल्याची माहिती समोर येत आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

 

सखाराम विश्वनाथ मरकाम (25, रा. विजयपूर, जि. बिलासपूर, राज्य – छत्तीसगड) असे खून झालेल्याचे नाव आहे. संजय हरबंसलाल वर्मा (28, रा. परतवाणी, जि. बलोदा बाजार, छत्तीसगड) आणि जोधिया विश्वनाथ मरकाम (23, रा. छत्तीसगड) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. शिवप्रसाद धूर्वे (28, रा. छत्तीसगड) याने त्यांच्यावर चाकुने हल्ला केला होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, मयत, जखमी आणि हल्लखोर हे बांधकाम मजुर आहे. ते पत्ते खेळत होते. त्यांच्यात भांडणे झाली. त्यातून
शिवप्रसादने तिघांवर चाकुने हल्ला केला. त्यामध्ये सखारामच्या छातीवर गंभीर जखम झाली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला (Murder In Pune).
इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी देहूरोड पोलिस स्टेशनमध्ये (Dehuraod Police Station) गुन्हा दाखल आहे.

 

Web Title :  Pune Pimpri Chinchwad Crime News | Murder Of Worker While Playing Cards In Dehuraod Police Station Area Laxmipura

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा