काय सांगता ! अभिनेत्री कियारा आडवाणीचं अभिनेता नाही, तर ‘या’ अभिनेत्रीवर आहे ‘गर्ल क्रश’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार कियारा आडवणी लवकरच आपला आगामी सिनेमा गुड न्यूजमध्ये दिसणार आहे. सिनेमातील पूर्ण स्टार कास्ट सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात कियाराव्यतिरीक्त करिना कपूर, अक्षय कुमार आणि दिलजीत दोसांझ हे कलाकारही दिसणार आहेत. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत कियारा आडवाणीनं एक खुलासा केला आहे जो कोणालाच माहिती नसावा.

कियारानं खुलासा केला आहे की तिचं करिना कपूरवर गर्ल क्रश आहे. एका प्रश्नाचं उत्तर देताना तिनं हा खुलासा केला. कियारा म्हणाली की, “कभी खुशी कभी गम” मधील तिचं पू हे कॅरेक्टर असो किंवा मग मधील गीत हे कॅरेक्टर असो किंवा तिचा डान्स असो मला असं वाटतं की ती माझीच नाही तर सगळ्यांची फेवरेट आहे.

दरम्यान गुड न्यूज या सिनेमाच्या निमित्ताने राज मेहता डायरेक्टर म्हणून डेब्यू करत आहेत. हिरू जोहर, अरुणा भाटिया, करण जोहर, अपूर्वा मेहता आणि शशांक खेताना यांनी प्रोड्युस केलेला हा सिनेमा 27 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.

गुड न्यूज या सिनेमाआधी कियारा कबीर सिंह या सिनेमात दिसली होती. या सिनेमात तिनं खूप साध्या सरळ मुलीची भूमिका साकारली होती. तिच्या अभिनयाचं भरभरून कौतुक होताना दिसलं.

 

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like