‘कबीर सिंह’ पाहून कियारा आडवाणीवर इम्प्रेस झाला ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता, पाठविले ‘खास’ गिफ्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री कियारा आडवाणी सध्या खूप चर्चेमध्ये आहे. कियारा आणि शाहिद कपूरचा चित्रपट ‘कबीर सिंह’ ने बॉक्स ऑफिस जबरदस्त कमाई केली. सध्या कियारा आणि शाहिद आपल्या चित्रपटाच्या यशाला एन्जॉय करत आहे.

सगळ्यांना माहित आहे की, ‘कबीर सिंह’ चित्रपट ब्लॉक बस्टर ‘अर्जुन रेड्डी’चा ऑफीशियल रिमेक आहे. चित्रपट ‘कबीर सिंह’ चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर अभिनेता ‘अर्जुन रेड्डी’ चित्रपटातील अभिनेता विजय देवरकोंडा याने कियाराला स्पेशल गिफ्ट दिले आहे. यासोबतच शुभेच्छा देऊन एक नोट पाठविले आहे. त्यावर विजयने काहीतरी लिहले आहे. याबद्दलची माहिती कियाराने स्वतः इंस्टाग्रामवर फोटो शेअर करुन दिली. यासोबतच कियाराने विजय देवरकोंडाला धन्यवाद बोलली आहे.

View this post on Instagram

Thankyouuuuuuuu sooooooooooo much for all the love ❤️🙏🏼

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

विजय देवरकोंडाने नोटवर लिहले की, ‘कियारा ‘कबीर सिंह’ चित्रपटाच्या यशाबद्दल शुभेच्छा. यश एन्जॉय कर. मी तुला माझ्या क्लोदिंग लाइनचे बेस्ट कपडे पाठवित आहे. ‘

कबीर सिंहमध्ये शाहिदची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली आहे. शाहिदबरोबरच कियारा आडवाणी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या चित्रपटाने आत्तापर्यंत 146.63 करोड़ रुपयाची कमाई केली आहे. याचबरोबर हा चित्रपट २०१९ चा सगळ्यात मोठा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने अनेकांचे रिकॉर्ड तोडले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप वांगाने केले होते.

View this post on Instagram

#MereSohneya ❤️

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on