Kidney Cure | हाय बीपी, पोटात वेदना आणि सूज दिसून आली तर असू शकतो किडनीसंबंधी ‘हा’ गंभीर आजार; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – किडनी (Kidney) हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो निरोगी राहण्यासाठी खूप आवश्यक आहे. शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ (Toxic Substances) काढून रक्त शुद्ध (Blood Purification) करणे हे किडनीचे (Kidney Cure) कार्य आहे. किडनी हे टॉक्सिन लघवीद्वारे काढून टाकते. किडनीमध्ये नेफ्रॉन (Nephron) म्हणून ओळखले जाणारे छोटे फिल्टर असतात. ते आपले रक्त शुद्ध करण्याचे काम (Kidney Cure) करतात.

 

किडनीच्या इतर कामांमध्ये लाल रक्तपेशींचे (Red Blood Cells) उत्पादन आणि आवश्यक हार्मोन्स (Hormones) रिलिज करणे यांचा समावेश होतो. किडनीद्वारे बाहेर पडणारे हार्मोन्स ब्लड प्रेशर कंट्रोल (Blood Pressure Control) करतात आणि व्हिटॅमिन डी (Vitamin D) देखील तयार करतात, ज्यामुळे आपली हाडे मजबूत (Bones Strong) होतात.

 

शरीर निरोगी ठेवण्यासाठी किडनी निरोगी (Kidney Healthy) असणे अत्यंत आवश्यक आहे. लक्षणे वेळीच ओळखली तर किडनीसंबंधी समस्या (Kidney Cure) टाळता येऊ शकते. इन्स्टिट्यूट ऑफ मेटाबॉलिक मेडिसिन Metabolic Medical Institute (MMI), पटणाशी संबंधित डॉ. विजय राघवन (Dr. Vijay Raghavan) यांच्या मते, किडनीचा आजार नीट समजून घेतल्यास या समस्येवर वेळीच उपचार करता येऊ शकतात.

 

किडनीशी संबंधित आजार कोणते आहेत आणि त्यांची लक्षणे कशी ओळखावीत.

1. अ‍ॅक्यूट किडनी फेल्युअर : Acute renal failure
या किडनीच्या समस्या तात्पुरत्या असतात आणि सहसा उपचाराने बर्‍या होतात. या आजारामुळे किडनी थोड्या काळासाठी नीट काम करणे बंद करते. या आजारामुळे रुग्णाला डायलिसिस (Dialysis) किंवा किडनी प्रत्यारोपणाची (Kidney Transplant) गरज भासत नाही. डायरिया हे या किडनीच्या आजाराचे प्रमुख कारण आहे.

 

2. क्रॉनिक किडनी फेल्युअर : Chronic Kidney Disease
किडनीच्या समस्येची ही एक गंभीर स्थिती आहे ज्यामध्ये किडनी काम करणे थांबवते. अशा स्थितीत जगण्यासाठी किडनीचे प्रत्यारोपण आवश्यक असते.

 

3. डायबिटिज नेफ्रोपॅथी : Diabetic Nephropathy
मधुमेहामुळे (Diabetes) होणार्‍या किडनीच्या समस्यांना डायबेटिक किडनी डिसिज (Diabetic Kidney Disease) म्हणतात. दीर्घकालीन डायबिटिजमुळे किडनीच्या रक्तवाहिन्यांचे नुकसान होते.

 

सुरुवातीला या नुकसानीमुळे लघवीमध्ये प्रोटीनचे प्रमाण दिसून येते, त्यामुळे हाय ब्लड प्रेशर (High Blood Pressure),
शरीरात सूज येणे (Body Swelling) अशी लक्षणे उद्भवू शकतात.
या समस्येमुळे किडनीच्या कार्यामध्ये सातत्याने घट होते, किडनी निकामी होण्याची शक्यता असते.

 

4. पॉलिसिस्टिक किडनी डिसिज : Polycystic Kidney Disease
किडनी सिस्ट (Kidney Cyst) ही एक पाण्यासारख्या द्रवाने भरलेली सूज असते जी एक किंवा दोन्ही किडनीमध्ये होऊ शकते.
किडनी सिस्ट गोलाकार असतात, ज्याचा आकार सूक्ष्म ते सुमारे 5 सेमी पर्यंत असू शकतो.

 

हे सिस्ट गंभीर स्थितीशी संबंधित असू शकतात. यामध्ये हाय ब्लड प्रेशर, पाठीत किंवा काखेत दुखणे आणि पोटात सूज येणे ही लक्षणे आहेत.

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Kidney Cure | kidneys disease types and symptoms know the early sign of of these disease

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bikini Girl Archana Gautam | हस्तिनापुरवर नाही चालली ‘बिकिनी गर्ल’ची जादू, कॉंग्रेसच्या अर्चनाला मिळाले इतके Vote

 

Nagpur Crime | नागपुरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळलेले अर्भक नर्सिंग होममधील ?

 

Pune Crime | दीड कोटींच्या फसवणूक प्रकरणी मॅप्स इंडस्ट्रिज इंडिया प्रा. लि., ओम एंटरप्रायझेसचे मालक सचिन धनशेट्टीसह 8 जणांविरूध्द गुन्हा दाखल