किम कार्दशिअन पती कान्ये वेस्टसोबत घेणार ‘घटस्फोट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अमेरिकेची प्रसिद्ध सेलिब्रिटी किम कार्दशअनचे (Kim Kardashian) जगभरात लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर किमचे फोटो आणि व्हिडीओ खूपच लोकप्रिय आहेत. आता तिच्या बाबतीत एक वृत्त समोर येत आहे. ती पती कान्ये वेस्टसोबत (Kanye West) घटस्फोट (Divorce) घेणार असल्याचे समजतय. दोघांमध्ये काही गोष्टी व्यवस्थित नसल्याने दोघे मागील अनेक महिन्यांपासून विभक्त रहात आहेत.

एका रिपोर्टनुसार, रिॲलटी टिव्ही (Reality TV) स्टार किम कार्दशिअन सध्या तिच्या चार मुलांसोबत लॉस एंजेलिसमध्ये राहते. तर तिचा पती रॅपर कान्ये वेस्ट सध्या वीयोमिंगमध्ये त्याच्या फार्म हाऊसवर रहात आहे. अशी चर्चा आहे की, त्यांच्या लग्नाला सात वर्षे झाली असून त्याच्यातील नातं आता शेवटच्या टोकाला पोहचलं आहे. या दोघांनी 2014 मध्ये लग्न केलं होतं. कान्येच्या आधी कीमने दोन वेळा लग्न केली आहेत. आता ती कान्ये वेस्ट सोबत घटस्फोट घेण्याच्या तयारीत आहे.

सुत्रांच्या म्हणण्यानुसार, किमने स्वत:च कान्यापासून विभक्त राहण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु कान्ये याने अद्याप हे स्पष्ट केले नाही की ती कधी घटस्फोट घेणार आहे. मागील काही महिन्यांपासून हे दोघे वेगवेगळे राहत आहेत. आता सोशल मीडियीवर देखील या दोघांचे एकत्र फोटो पहायला मिळाले नाहीत. कारण यापूर्वी किमने अनेकवेळा तिच्या पतिसोबतचे फोटो शेअर केले होते.

किमचं संपूर्ण कुटुंब सेलिब्रिटी आहे. किमचे वडिल रॉपर्ट कार्दशिअन अमेरिकेचे मोठे वकिल होते आणि तिची आई क्रिस जेनर देखील लोकप्रिय सेलिब्रिटी आहे. किम कार्दशिअनला तिच्या कर्व बॉडीसाठी ओळखले जाते. हॉलीवूडच्या ( Hollywood) टॉप मॉडेल्स पैकी किम एक आहे.