‘लॉकडाऊन’मध्ये ‘किंग खान’च्या जवळच्या व्यक्तीचं निधन ! ट्विट करत मांडल्या भावना

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार शाहरुख खानच्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. शाहरुख खानची कंपनी रेड चिलीज एंटरटेंमेंटचे खास सदस्य अभिजीत यांचं निधन झालं आहे. असं सांगितलं जात आहे की, शाहरुख खान आणि पत्नी गौरी खान सुरुवातीपासून रेड चिलीज एंटरटेंमेंटला जोडले गेले होते.

लॉकडाऊन असल्यानं शाहरुखनं घरातून सोशल मीडियावरून अभिजीतच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. शाहरुखनं ट्विट केलं की, “आम्ही सर्वांनी ड्रीम्स अनलिमिटेडसोबत सिनेमा बनवण्याचा प्रवास सुरू केला. अभिजीत माझा सर्वात चांगला सहकारी होता. आम्ही चांगलं केलं आणि काही चुकीचंही. परंतु नेहमीच पुढे जात राहिलो. तो टीमचा खूप मजबूत सदस्य होता. तू नेहमीच आठवशील मित्रा.”

शाहरुखव्यतिरीक्त रेड चिलीजनंही ट्विट करत अभिजीतच्या निधनाची माहिती दिली आहे आणि दु:ख व्यक्त केलं आहे. रेड चिलीजनं म्हटलं की, “रेड चिलीज कुटुंबातील पहिल्या टीममधील सदस्यांपैकी एक अभिजीतचा मृत्यू झाल्यानं आम्हाला खूप दु:ख वाटत आहे. आम्ही कायम त्यांना मिस करू. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. आमच्या संवेदना कुटुंब आणि मित्रांसोबत आहेत.”