Kirit Somaiya | किरीट सोमय्यांचा अजित पवारांवर निशाणा; म्हणाले – ‘डझनभर पवार लाईनमध्ये रडत होते, लवकरच…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Kirit Somaiya | भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) सतत महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi Government) नेत्यांवर आरोपांची धाड टाकत असतात. आताही सोमय्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘अजित पवारांचा जरंडेश्वर कारखाना (Jarandeshwar Factory) जप्त झाला आहे. डझनभर पवार लाईन मध्ये रडत होते. बेनामी संपत्ती प्रकरणी अजूनही अजित पवारांवर चौकशी सुरू’ असं भाष्य किरीट सोमय्यांनी केलं. त्यावेळी त्यांनी मुंबईत (Mumbai) माध्यमांशी संवाद साधला.

 

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले की, ”अजित पवारांचा जरंडेश्वर कारखाना जप्त झाला आहे. डझनभर पवार लाईन मध्ये रडत होते. बेनामी संपत्ती प्रकरणी अजूनही अजित पवारांवर चौकशी सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. ‘वकील सतीश उके (Lawyer Satish Uke) यांच्यावर ईडीने कारवाई केली. उके महाराष्ट्राला लुटत होते. माफियागिरी करत आहे. ईडीनं सर्च केला कारवाई केली. पण काहीतरी केलं म्हणून बाहेर येतंय. माझ्या विरोधात पण त्यांनी वकीलपत्र घेतलं होतं पण वकीलपत्रामुळे कोणावर कारवाई होत नाही. कारवाई होत असेल तर घोटाळा केला हे नक्की.”

पुढे बोलताना सोमय्या म्हणाले, ”हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्यावर कारवाईचा प्रारंभ झाला आहे.
यशवंत जाधव यांचे खाते मिळाले.
त्यात वरिष्ठ अधिकारी आहेत. तो पैसा वांद्रे इथं जाताना दिसत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा मुलगा आहे म्हणून पैसे लुटण्याचा अधिकार मिळतो असं नाही”.
असं ते म्हणाले. दरम्यान, ”दोन दिवसांतच अनिल परब (Anil Parab) यांच्यावर कोर्टाने फौजदारी प्रक्रिया प्रारंभ केली.
लवकरच महाविकास आघाडीचे काही मंत्री तरुंगात जाणार आहे,” असा दावा देखील किरीट सोमय्या यांनी केला आहे.

 

Web Title :- Kirit Somaiya | ajit pawars probe into disproportionate assets case begins claims kirit somaiya

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा