Kirit Somaiya | किरीट सोमय्यांच्या आरोपाने ठाकरे अडचणीत, ऑक्सिजन प्लान्टसाठी सेकंड हँड वस्तू खरेदी केल्या

मुंबई : Kirit Somaiya | काल मुंबईतील नागपाडा पोलीस ठाण्यात (Nagpada Police Station) कोरोना काळातील ऑक्सिजन प्रकल्पात सहा कोटींचा गैरव्यवहार झाल्याप्रकरणी मे. हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचे (Highway Construction Company) रोमिन छेडा, महापालिकेचे संबंधित अधिकारी आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणावरून भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

हा ऑक्सिजन घोटाळा (Oxygen Plant Scam) आदित्य ठाकरे आणि रोमिन छेडा यांनी संगनमताने केल्याचा आरोप किरीट सोयम्या यांनी केला आहे. याबाबत किरीट सोमय्या म्हणाले, याप्रकरणी कारवाई करण्यासाठी मी १० ऑगस्ट २०२१ रोजी पोलिसांत तक्रार केली होती. याच रोमिन छेडाला मुबईच्या राणीबागेत पेंग्विन आणण्याचे कंत्राट दिले होते. मात्र, विरोध झाल्यानंतर रोमिन छेडाला ब्लॅकलिस्ट केले होते.

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले, तरीही पुन्हा रोमिन छेडाच्या कंपनीला उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या १३ रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लान्ट सुरू करण्याचे कंत्राट दिले. त्यासाठी १४० कोटी रुपये देण्यात आले. रोमिन छेडाने पैसे घेऊन केवळ ३८ कोटींचे प्लान्ट उभारले. १०२ कोटींचा ऑक्सिजन चोरण्याचे पाप केले. यात ठाकरे गटाचे नेते भागीदार असून त्यांना उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद होता, असा आरोप सोमय्या यांनी केला.

किरीट सोमय्या पुढे म्हणाले, करोना काळात शेकडो रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला त्याची जबाबदारी उद्धव ठाकरे घेणार का? रोमिन छेडाच्या कंपनीला आदित्य ठाकरे यांनी महापालिकेची ५३ प्रकारची कंत्राटे दिली. छेडा याला मुंबईत १३ प्लान्ट बसवण्याचे काम दिले होते.
परंतु, त्याने ३८ कोटी रुपयांमध्ये दिल्लीतील कंपनीकडून सेकेंड हँड वस्तू खरेदी केल्या आणि प्लान्ट बसवले.

सोमय्या म्हणाले, छेडाने बसवलेल्या प्लान्टपैकी काही प्लान्ट त्यावेळी सुरू झालेच नाहीत. हे प्लान्ट एक वर्षाने सुरू झाले.
त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी सोमय्या यांनी केली.

सोमय्या म्हणाले, रोमिन छेडाला कंत्राट देणारे महापालिकेची अधिकारी आणि पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल
यांची चौकशी करावी. मी याबाबत आयकर विभाग आणि ईडीकडे तक्रार केली आहे.
मुंबई पोलीस तपास करत आहेत, अशी माहिती सोमय्या यांनी दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पक्षपातीपणाचा आरोप करत सुनिल प्रभूंची विधानसभा अध्यक्षांविरोधात तक्रार; सुनावणीसाठी १६ दिवस शिल्लक