Kirit Somaiya | ‘साई रिसॉर्टची चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा’ – किरीट सोमय्या

दापोली : पोलीसनामा ऑनलाइन – साई रिसॉर्ट हा मुद्दा भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी उकरून काढला होता. त्यांनी हे रिसॉर्ट शिवसेनेचे माजी परिवहनमंत्री अनिल परब यांचे असल्याचा दावा केला होता. परबांनी मात्र हा दावा फेटाळला होता. त्यावर न्यायालयात सुनावणी झाली आणि रिसॉर्ट अनधिकृत असल्याचा निकाल न्यायालयाने दिला. आता या रिसॉर्टप्रकरणी काही माहिती चुकीची देऊन न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी एका अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची नवीन मागणी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केली आहे. त्यांनी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे.

 

दापोलीतील साई रिसॉर्टची स्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश कनिष्ठ न्यायालयाने दिले होते. त्यामुळे रिसॉर्टच्या बांधकामावर पाडकाम कारवाई केली नसल्याचे रत्नागिरी उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रतिज्ञा पत्राद्वारे न्यायालयाला सांगितले होते. पण, त्यांनी केलेला हा दावा खोटा असून, त्यांनी न्यायालयाची दिशाभूल केली आहे, असे किरीट सोमय्या यांचे मत आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यावर न्यायालयाचा अवमान कारवाई करण्याची मागणी सोमय्या यांनी मंगळवारी उच्च न्यायालयात (Mumbai High Court) केली. (Kirit Somaiya)

दापोली येथील साई रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशाविरोधात रिसॉर्टचे मालक सदानंद कदम यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी न्यायालयात केली होती. रिसॉर्ट पाडण्यासारखी कोणतीही कठोर कारवाई करताना रिसॉर्टचे मालक कदम यांना पूर्वसूचना देण्याचे आदेश न्यायालयाने केंद्रीय मंत्रालयाला दिले होते. तसेच कदम यांना या निकालाविरोधात दाद मागण्याची मुभादेखील देण्यात आली होती. रत्नागिरी उपविभागीय अधिकाऱ्याने न्यायालयात स्थिती जैसे थे असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यात त्यांनी कोणतीही पाडकाम कारवाई न झाल्याचे सांगितले होते. मात्र, सरकारी अधिकाऱ्यांनी याचिकाकर्त्यांना मदत करण्याच्या हेतूने न्यायालयाची दिशाभूल करणारे प्रतिज्ञापत्र दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

 

त्यामुळे त्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी सोमय्या यांनी केली.
या प्रकरणी सोमय्या यांनी अवमान याचिका दाखल करून न्यायालयाची दिशाभूल करणारे प्रतिज्ञापत्र
सादर करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यावर अवमान कारवाईची मागणी केली.

 

Web Title :- Kirit Somaiya | take necessary action against officials for submitted misleading affidavit in court kirit somaiya

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Petrol-Diesel Prices | ‘केंद्र सरकार दर 15 दिवसांनी कच्च्या तेलांच्या किमतीचा घेणार आढावा’ – निर्मला सीतारामन

Kul kayda – Land Sell | आता कूळकायद्यातील जमिनीही विकता येणार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Pune Crime | ‘तू माझी नाही झाली तर कोणाची होऊ देणार नाही’ ! युवतीला धमकावुन तोंडावर अ‍ॅसीड फेकण्याची धमकी