Kirit Somaiya Viral Video | किरीट सोमय्यांच्या व्हायरल व्हिडिओची महिला आयोगाने घेतली दखल, मुंबई पोलिसांना दिले ‘हे’ आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप खासदार (BJP MP) किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल (Kirit Somaiya Viral Video) झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओचे पडसाद पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session) उमटले. आता या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाने (State Women’s Commission) घेतली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी किरीट सोमय्यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओवर (Kirit Somaiya Viral Video) प्रतिक्रिया दिली आहे. त्या मंगळवारी (दि.18) माध्यमांशी बोलत होत्या.

 

रुपाली चाकणकर म्हणाल्या, भाजप नेते किरीट सोमय्या यांचा जो आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल (Kirit Somaiya Viral Video) झाला तेव्हा महाराष्ट्रातील अनेक संस्थांनी राज्य महिला आयोगाकडे विचारणा केली. राज्य महिला आयोगाने याची दखल घेऊन मुंबई पोलीस आयुक्तांना (Mumbai Police Commissioner) या संपूर्ण घटनेचा तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय या प्रकरणी वस्तूस्थितीदर्शक अहवाल लवकरात लवकर आयोगाला सादर करण्यास सांगितले आहे.

 

रुपाली चाकणकर पुढे म्हणाल्या, आतापर्यंत पीडित महिला आपल्याकडे तक्रार घेऊन आली तर आपण कारवाई करतोच. त्याहीपुढे जाऊन सामूहिक बलात्कार (Gang Rape) किंवा इतर गुन्ह्यांमध्ये आपण स्वत: दखल घेतो. त्यामुळे पीडित महिलांची तक्रार आली, तर त्याची नक्कीच दखल घेतली जाते. आतापर्यंत या प्रकरणी आयोगाकडे कोणतीही माहिती आली नाही. पोलिसांचा अहवाल आम्हाला येईल तेव्हा त्यावर आम्ही कारवाई करु, असंही चाकणकर यांनी सांगितलं.

 

 

सोमय्यांची चौकशीची मागणी

एका वृत्तवाहिनीवर माझी व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, अशा अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहे, अनेक महिलांच्या तक्रारी आहेत असे दावे केले जात आहे. माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अशा अत्याचार झालेला नाही. अशा आरोपांची व्हिडिओची सत्यता तपासावी चौकशी करावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे.

 

कोणाला पाठिशी घालणार नाही

किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल.
कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. अशाप्रकारच कुठलेही प्रकरण दाबले किंवा लपवले जाणार नाही.
किरीट सोमय्या यांनी मला पाठवलेल्या पत्रातही तीच मागणी केली आहे.
या सगळ्याची सखोल आणि वरिष्ठ स्तरावर चौकशी केली जाईल,
असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मात्र, संबंधित प्रकरणात महिलेची ओळख जाहीर करता येणार नाही.
त्यामुळे पोलीस या महिलेची ओळख पटवतील आणि कायद्याच्या चौकटीत राहून या प्रकरणाचा तपास करतील,
असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यामुळे आता चौकशीतून काय माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

Web Title : Kirit Somaiya Viral Video | maharashtra state-women-commission-president-rupali-chakankar-on-kirit-somaiya-viral video

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा