कृषी कायदे स्थगित करण्याचा सरकारचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला, कायदे रद्द करण्याच्या भूमिकेवर ठाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तीन नवीन शेती कायद्यांवरील गतिरोध दूर करण्यासाठी बुधवारी मोदी सरकारने थोडी नरमाई दाखवत कायदे वर्षासाठी निलंबित करण्यासाठीचा प्रस्ताव शेतकरी संघटनांपुढे ठेवला होता. ज्यावर विचार विनिमय करून शेतकरी उत्तर देणार होते. दरम्यान शेकऱ्यानी हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. सरकारबरोबर चर्चेच्या दहाव्या फेरीतील प्रस्तावांवर चर्चा करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने गुरुवारी कित्येक तास सर्वसाधारण सभा घेतली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. त्यात उद्या आणि म्हणजे 22 जानेवारी रोजी सरकार आणि शेतकरी यांच्यात 11 व्या चर्चेच्या आधी हा निर्णय येणे फार महत्वाचे आहे. दरम्यान, बुधवारी शेतकरी नेत्यांनी तातडीने सरकारचे प्रस्ताव मान्य केले नाहीत आणि परस्पर चर्चेनंतर ते सरकारसमोर आपले मत मांडतील म्हंटले होते.

कायदा रद्द करावा
शेतकरी म्हणाले की, ते तीन केंद्रीय कृषी कायदे पूर्णपणे रद्द करण्याच्या आणि सर्व शेतकर्‍यांसाठी सर्व पिकांवर लाभदायक एमएसपीसाठी कायदा करण्याच्या मुद्यावर कायम आहेत. शेतकरी चळवळीच्या या प्रमुख मागण्या असून ते यावर ठाम असल्याचे शेतकरी सांगतात. संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने शेतकरी नेते दर्शपाल सिंह यांनी निवेदन जारी केले की, या आंदोलनात आतापर्यंत शहीद झालेल्या 147 शेतकर्‍यांना मोर्चाने श्रद्धांजली वाहिली आहेत. जनआंदोलन लढताना हे साथीदार आपल्यापासून विभक्त झाले आहेत. त्यांचा त्याग व्यर्थ ठरणार नाही. तसेच ते म्हणाले की, पोलिस प्रशासनाबरोबर झालेल्या बैठकीत पोलिसांनी आम्हाला दिल्लीत प्रवेश करू नका असे सांगितले आहे, तर शेतकऱ्यांनी दिल्लीच्या रिंग रोडवर जोरदार परेड करण्याविषयी बोलले आहे.

अनेक राज्यांमधून ट्रॅक्टर घेऊन दिल्लीत येतायेत शेतकरी
दर्शपाल सिंह म्हणतात की, आमची चळवळ शांततेत सुरू आहे, ती आता देशव्यापी झाली आहे. कर्नाटकात अनेक ठिकाणी वाहन रॅलीद्वारे शेतकरी प्रजासत्ताक दिनासाठी एकत्र येत आहेत. केरळमध्ये अनेक ठिकाणी शेतकरी ट्रॅक्टर मोर्च काढत आहेत. त्यांच्या मते उत्तराखंडमधील बिलासपूर आणि रामपूर येथे ट्रॅक्टरवर मोर्चा काढून शेतकरी दिल्लीतल्या शेतकर्‍यांच्या परेडची तयारी करत आहेत. छत्तीसगडमधील शेतकरी 23 जानेवारीला राजभवनाला घेराव घालतील आणि एक तुकडी दिल्लीलाही रवाना होईल.

दर्शपाल सिंह यांनी सांगितले की, ओडिशा येथून निघालेल्या नवनिर्माण किसान संघटनेची किसान दिल्ली चलो यात्रा उत्तर प्रदेश पोलिसांकडून वारंवार त्रास दिला जात आहे. त्यांचा मार्ग बदलण्यासाठी व सभा घेऊ नये अशा सूचना देण्यात येत आहेत. प्रशासनाच्या या वर्तनाला आम्ही विरोध करतो. तसेच, कोलकाता येथे 3 दिवसीय भव्य रॅली 20 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान होईल. काल झालेल्या विशाल कार्यक्रमात हजारो लोक सहभागी झाले होते. येणार्‍या काळात हे आणखी वेगवान होण्याची शक्यता आहे. मजदूर किसान शक्ती संघटनेच्या नेतृत्वात शेतकरी, मजूर आणि सामान्य लोक शाहजहांपूर सीमेवर पोहोचत आहेत, असेही शेतकरी नेते म्हणाले.