फायद्याची गोष्ट ! हमखास दुप्पट पैसे करण्याची ‘खास’ स्कीम ! 118 महीन्यात होतील ‘डबल’, असा घेऊ शकता ‘लाभ’, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्त संस्था – जर तुम्ही तुमचे पैसे दुप्पट करण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र (केव्हीपी) योजनेत गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणुकीतून गुंतवणूकदाराला त्याचे पैसे सुरक्षित राहण्याची आणि चांगले रिटर्न मिळण्याची गॅरंटी मिळते. या योजनेसाठी व्याजाचा दर आणि गुंतवणूक दुप्पट होण्याचा कालावधी सरकारद्वारे तिमाही आधारावर ठरवला जातो. इंडिया पोस्टच्या वेबसाइटनुसार, किसान विकास पत्राचा मॅच्युरिटी कालावधी 124 महिने आहे. म्हणजेच या योजनेत आता ग्राहकाची गुंतवणूक 124 महिने म्हणजे 10 वर्ष आणि 4 महिन्यात दुप्पट होईल.
कोण करू शकतात गुंतवणूक ?
किसान विकास पत्रात गुंतवणूक करणार्याचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे. यामध्ये सिंगल अकाऊंटशिवाय जॉईंट अकाऊंटचीसुद्धा सुविधा आहे. तसेच ही योजना अल्पवयीनांसाठी सुद्धा उपलब्ध आहे, ज्याची देखरेख पालकांना करावी लागते. ही योजना हिंदू अविभाजित कुटुंब म्हणजे एचयुएफ किंवा एनआरआय वगळून ट्रस्टसाठी सुद्धा लागू आहे. केव्हीपीमध्ये 1000 रुपये, 5000 रुपये, 10,000 रुपये आणि 50,000 रुपयांपर्यंतचे सर्टिफिकेट आहेत, जे खरेदी करता येतात.
व्याजदर
केव्हीपीसाठी आर्थिक वर्ष 2021 ची दुसरी तिमाही म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत याचा व्याजदर 6.9 टक्के ठरवण्यात आला आहे. येथे तुमची गुंतवणूक 124 महिन्यात डबल होईल. जर तुम्ही एकरकमी 1 लाख रुपये गुंतवलेत तर तुम्हाला मॅच्युरिटीवर 2 लाख रुपये मिळतील. 124 महिन्यांच्या या स्कीमचा मॅच्युरिटी पीरियड आहे.
किसान विकास पत्र जारी करण्याच्या तारखेच्या अडीच वर्षानंतर पूर्तता केली जाऊ शकते. केव्हीपी एका पोस्ट ऑफिसमधून दुसर्या पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा स्थलांतरित करता येते. किसान विकास पत्र एक व्यक्ती दुसर्या व्यक्तीला हस्तांतरीत करू शकते. केव्हीपीमध्ये नॉमिनेशनची सुविधा उपलब्ध आहे. किसान विकास पत्र पासबुकच्या आकारात जारी करण्यात येते.