KL Rahul | ‘…म्हणून पंजाब किंग्ज सोडण्याचा निर्णय घेतला’; के. एल. राहुलने केला मोठा खुलासा!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – KL Rahul | IPL 2022 साठी फ्रेंचायजींनी रिटेंशन लिस्ट प्रसिद्ध केली तेव्हा त्यातील अनेक नावं पाहून धक्का बसला होता. या यादीमध्ये अनपेक्षित अशी नावं होती, यामधील एक नाव म्हणजे के. एल. राहुल. कारण जवळपास चार वर्षे पंजाब किंग्ज संघाचा के. एल. राहुल (KL Rahul) हिस्सा राहिला होता. मात्र पंजाब किंग्जने (Punjab Kings) नाहीतर खुद्द राहुलने स्वत: चं संघ सोडण्याचा निर्णय घेतला होता.

 

मी पंजाब संघाकडून चार वर्षे खेळलो, माझ्यासाठी हा निर्णय खूप कठीण होता मात्र मी अजून काही नवीन करू शकतो का?, हे मला पाहायचं होतं म्हणून मी निर्णय घेतला असल्याचं के. एल. राहुल म्हणाला. राहुलने (KL Rahul) पंजाबसाठी खेळावं अशी संघाचीही इच्छा असल्याचं पंजाब संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी सांगितलं.

 

आम्हाला राहुलला रिटेन करायचं होतं म्हणून आम्ही त्याची दोन वर्षआधीच त्याची कर्णधारपदी निवड केली होती. मात्र त्याच्या निर्णयाचा आम्ही स्वीकार करतो. कारण तो निर्णय स्वत: खेळाडूचा असतो, असं अनिल कुंबळे म्हणाले.

 

दरम्यान, राहुलने कर्णधारपदी असताना फार काही प्रभावित केलं नाही.
राहुल फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करायचा मात्र तो कर्णधार असताना आपल्या संघाला प्ले-ऑफच्या फेरीत नेवू शकला नाही.
मात्र तरीही पंजाब संध व्यवस्थापन त्याला आपल्या कर्णधारपदी ठेवण्यासाठी इच्छुक होतं.
राहुलनंतर आता पंजाब किंग्ज संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी मयंक अग्रवालकडे जाणार असल्याचं बोललं जात आहे.

 

Web Title :- KL Rahul | ipl 2022 why left punjab kings finally kl rahul reveals real reason

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nora Fatehi Bold Photoshoot | नोरा फतेहीनं घातला इतका घट्ट ड्रेस; चाहते म्हणाले – ‘श्वास कसा घेतेस..?’

 

Pune Cyber Crime | मुलाची चूक पोलीस हवालदाराला पडली महागात, सायबर चोरट्यांचा बँक खात्यावर डल्ला

 

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिकेचे प्रशासक विक्रम कुमारांचा अनेक नगरसेवकांसह दिग्गजांना दणका ! मनपाच्या इमारती, वास्तु व जागा वापराबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय