सरकारचे नवे पोर्टल ‘Saksham’, ज्यामुळे मिळणार १० लाख लोकांना नोकरी; ‘या’ पध्दतीनं होतं काम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकार आता डिजिटल माध्यमातून लोकांना सेवा उपलब्ध करून देत आहे. अशाच एका पोर्टलची सुरवात सरकारने केली आहे. ज्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना नोकरी मिळणार आहे. या पोर्टलच्या माध्यमातून एमएसएमई कंपन्यांसोबत कामगारांचा सरळ संपर्क करून दिला जाईल. यामुळे अनेक लोकांना रोजगार मिळणार आहे आणि प्रत्येक व्यक्ती मोठ्या कंपनीसोबत जोडले जातील.

या पोर्टलची सुरवात गेल्या महिन्यात केली आहे आणि आता याची सुरवात पायलट प्रोजेक्टच्या आधारावर केली गेली आहे. सद्या काही जिल्ह्यात या वेबसाईटची सुरवात केली आहे आणि हळूहळू याचा विस्तार केला जाईल. अशातच जाणून घ्या, या पोर्टलचा फायदा कोण कोणत्या लोकांना आणि कोणत्या प्रकारे मिळणार आहे.

जाणून घ्या या पोर्टलशी निगडित काही खास गोष्टी…
काय आहे सक्षम ?
टायफैकने एमएसएमईची गरज आणि कामगारांचे कौशल्य यांना एकत्र जोडून ‘सक्षम’ या पोर्टलची सुरवात केली आहे. ११ फेब्रुवारीला याची सुरवात केली, ज्याद्वारे एमएसएमई कंपन्यांचा कामगारांशी सरळ संपर्क करून दिला जाईल. यामुळे त्यांना सहज रोजगार मिळू शकेल. या पोर्टलची सुरवात या उद्धेशाने गेली गेली आहे की, कामगारांना नोकरी देण्याच्या प्रक्रियेत येणारे दलाल संपून जातील आणि कामगारांना त्यांच्या कौशल्याच्या आधारावर नोकरी मिळेल.

हे पोर्टल वेगवेगळ्या शहरात कामगारांच्या कौशल्यावर आधारित उद्योगांची माहिती देते. यामध्ये एल्गारिथम आणि आर्टीफिशल इंटरलिजेंटचा वापर केला गेला आहे. सोबत जर तुम्ही ट्रेनिंग घेणार असाल तर त्यासंबंधीत माहिती ही यामध्ये दिली गेली आहे. लॉन्चिंगच्या वेळी याला पायलट प्रायोजनेनुसार सद्या दोन जिल्हात सुरवात केली गेली आहे. पोर्टलने पूर्ण क्षमतेने काम सुरु केले आहे. या पोर्टलचा ऍड्रेस आहे, www.sakshamtifac.org.

कसे काम करते ?
या पोर्टलवर कामगार आणि उयोजक यांच्याशी संबंधित डेटा/माहिती विविध व्हॉट्सअप आणि अन्य लिंकच्या स्वरूपात स्वयंचलित रूपात अपडेट केला जात आहे. सोशल मीडिया आणि विविध चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण देशात कामगार आणि एमएसएमई यांच्यात लोकप्रिय बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी विविध राज्य सरकार आणि एमएसएमई समूहांसोबत चर्चा चालू आहे. यामध्ये लोक मोफत स्वतःची माहिती देऊ शकतील.

विशेष गोष्टी कोणत्या ?
यामुळे कामगारांना सोबत एमएसएमई यांना संधी मिळाली आहे आणि त्यांना कोणत्याही समस्येविना सहज कामगार मिळत आहेत. सरकारद्वारे दिलेली माहितीनुसार, दहा लाख लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याची सुविधा आहे. यामुळे कामगारांना आणि एमएसएमई यांच्यामध्ये सरळ संपर्क राहील. त्यामुळे मध्यस्थांचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून कामगारांच्या स्थलांतरणाला थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे.