Post Office ची भन्नाट स्कीम ! मासिक उत्पन्न योजनेत प्रति महिना मिळणार 5000 रुपये

नवी दिल्ली : भारतीय पोस्ट ऑफिस (Indian Post Office) नागरिकांसाठी अनेक योजना आणत असते. पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम्समध्ये व्यक्तीला परतावा मिळत असे. व्यक्तीला प्रतिमहिना मिळकत हवी असल्यास यामध्ये मासिक उत्पन्न योजना हा एक बेस्ट मार्ग आहे. यामध्ये व्यक्ती आपली गुंतवणूक (Investment) करू शकतो. या बचतीद्वारे प्रतिमहिना ४९५० रुपयाची मिळकत होऊ शकते. व्यक्तीने गुंतवणूक केल्याने चांगली मिळकत मिळावी यासाठी व्यक्ती अनेक पर्याय शोधात असते. तसेच ही पोस्टाची योजना व्यक्तीसाठी अतिशय चांगली आहे. यामध्ये एकल खाते अथवा संयुक्त खाते उघडता येऊ शकते. या योजनेबाबत जाणून घ्या.

भारतीय पोस्ट ऑफिसच्या या मासिक उत्पन्न योजनेत (Monthly income plan) एकल अथवा सयुंक्त कोणत्याही प्रकारच्या खात्यामध्ये एक निश्चित रक्कम भरविले लागते. व्यक्तीच्या खात्यामध्ये प्रतिमहिना किती रुपये जमा होणार हे या रकमेवर अवलंबून आहे. या योजनेमध्ये ५ वर्षांसाठी गुंतवणूक करता येते त्यानंतर ५ वर्षांच्या अंतराने वाढवता सुद्धा येते. व्यक्तीच्या गुंतवणुकीची सर्व जोखीम सरकार उचलत आहे यामुळे व्यक्ती विश्वासाने गुंतवणूक करू शकते. या योजनेत तिमाहीसाठी सरकारने ६.६ टक्के वर्षांमधील व्याजदर हा फिक्स केला आहे.

या योजनेबाबत सविस्तर माहिती –

या योजनेमध्ये मासिक उत्पन्न योजना आहे, या योजनेत ६.६ टक्के वार्षिक व्याजदर असणार आहे. या योजनेत मॅच्युरिटी पिरियड ५ वर्षे आहे, परंतु, नंतर ५ वर्षांसाठी तो वाढवता येतोतर किमान गुंतवणूक १ हजार रुपये आहे. स्कीममधील एकल खात्यामध्ये ४.५ लाख रुपये तसेच, संयुक्त खात्यात ९ लाख रुपये बचत करू शकता. संयुक्त खात्यात अधिक तर ३ व्यक्ती असणार आहे. तर खाते उघडण्यासाठी १० वर्षाहून मोठा अल्पवयीन मुलगा किंवा मुलीसाठी पालकांच्या नावे खातं उघडता येतं.

मासिक रक्कम कशी मोजतात?
व्यक्तीला एकदाच गुंतवणूक करायची असते. गुंतवणूक केलेल्या रकमेवर वार्षिक व्याजानुसार जी रक्कम येते तिला १२ भागांत विभागून ती रक्कम प्रति महिना व्यक्तीच्या अकाउंटमध्ये जमा होत.

प्रति महिना ५ हजार कसे मिळणार?
>व्यक्ती पोस्टात संयुक्त खाते उघडलं तर
>संयुक्त खाते अंतर्गत एकरकमी गुंतवणूक: ९ लाख रुपये
> वार्षिक व्याज: ६.६ %
> १ वर्षाच्या व्याजाची रक्कम- ५९४०० रुपये
> प्रति महिना व्याज: ४९५० रुपये

एकल खाते असेल तर –
> एकरकमी गुंतवणूक ४.५ लाख रुपये
> वार्षिक व्याज ६.६ टक्के
> १ वर्षाचं व्याज:२९.७०० रुपये
> प्रति महिना व्याज २४७५ रुपये

असे उघडा खाते –
> जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये बचत खातं उघडा.
> ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र अथवा ड्राइव्हिंग लाइसन्स सोबत ठेवा.
> २ पासपोर्ट साइज फोटो देखील आवश्यक
> पत्त्याचा पुरावा म्हणून सरकारी यंत्रणेनी दिलेलं ओळखपत्र किंवा सेवेचं बिल सोबत न्या.
> पोस्ट ऑफिसात जाऊन मासिक उत्पन्न योजनाचा अर्ज भरा तो अर्ज ऑनलाइन डाउनलोडही करता येतो.
> हा अर्ज आणि कागदपत्रे दिलीत की व्यक्तीचे खातं सहज उघडलं जातं.
> अर्जावर नॉमिनीचं नाव द्यायला पाहिजे.
> खातं उघडण्यासाठी सुरुवातीला १ हजार रोख भरावे लागतील तरच हे खातं उघडता येणार आहे.