Budget 2019 : निर्मला सितारामण यांनी ‘का’ वाटला संसदेत हलवा ? ; जाणून घ्या संसदेतील ‘हलवा समारंभ’ बद्दल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या अर्थ संकल्पाबाबत सर्वत्रच चर्चा सुरु असताना आता अर्थ संकल्पाच्या आधी साजरा करण्यात आलेल्या हलवा समारंभाची चर्चा सुरु झाली आहे. हा हलवा समारंभ अर्थसंकल्पासंबंधित कागद पत्रांची छपाई करण्याआधी साजरा करण्यात येतो. वित्त मंत्रालयाच्या बेसमेंट मध्ये अर्थसंकल्पाच्या कागदपत्रांची छपाई हलवा समारंभापासून होते. हा हलवा वित्तमंत्री जवळपास 100 अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना वाटतात.

भारतात कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना तोंड गोड करण्याची पद्धत आहे. अर्थसंकल्पासंबंधित कागद पत्रांची छपाई करण्याआधी बनवण्यात आलेला हा हालवा अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना वाटण्यात येतो.

यानंतर वित्त मंत्रालयातील जवळपास 100 कर्मचारी नॉर्थ ब्लॉकमध्ये बेसमेंटमध्ये बनवण्यात आलेल्या प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करतात, तेही कोणाशीही कोणताही संपर्क न ठेवता.

देशाच्या अर्थसंकल्पाची प्रिंटिंग सर्वात गुप्त ऑपरेशनमधील एक ऑपरेशन सांगण्यात येेते. कारण यात अर्थसंकल्पासंबंधित बरीच महत्वपुर्ण माहिती यात असते आणि ती माहिती बाहेर आल्यास सरकारवर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात.

या दरम्यान कर्मचारी आपल्या कुटूंबाला किंवा मित्रमंडळीना भेटू शकत नाही. प्रिंटिंग प्रेसमध्ये एक लँडलाईन फोन असतो. त्यात फक्त इनकमिंगची सुविधा असते. याशिवाय काही अधिकाऱ्यांशिवाय कोणालाच आत जाण्याची अनुमति नसते.

आरोग्य विषयक वृत्त- 

आजपासून योगा करण्याचा संकल्प करणार असाल तर या “आसनांपासून” करा सुरुवात 

मधुमेह, मानसिक आजार आणि हृद्यरोगाला दूर ठेवण्यासाठी करा हे “प्राणायम” 

ह्रदयाची घ्या अशी काळजी , कधीही होणार नाहीत ब्लॉकेजेस …! 

गर्भधारने दरम्यान महिलांनी घ्या व्यायामाची अशी ” काळजी ”