SBI चा सतर्कतेचा इशारा ! कधीही इंटरनेटवर सर्च करू नका ‘हा’ नंबर; अकाऊंटवरून कट होऊ शकतात पैसे

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  SBI कार्डने ग्राहकांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. SBI कार्डने या सतर्कतेद्वारे वापरकर्त्यांना चेतावणी दिली आहे की इंटरनेटवर टोल फ्री क्रमांक चेक करण्याचा निर्णय तुमच्यासाठी कठीण निर्णय सिद्ध होऊ शकतो. या सतर्कतेमध्ये असे सांगण्यात आले आहे की इंटरनेटवर टोल फ्री अथवा कंज्यूमर नंबर सर्च करू नका. यासोबत SBI कार्डने आपल्या वापरकर्त्यांना अधिक माहिती दिली आहे, त्यानुसार वापरकर्त्यांनी इंटरनेटचा वापर केला पाहिजे.

SBI ने ग्राहकांना दिलेल्या माहिती पत्रात असे सांगितले आहे की टोल फ्री नंबर शोधणे तुम्हाला महागात पडू शकते. जेव्हा तुम्हाला बँक अथवा कोणत्याही कामासाठी कंज्यूमर केअरची आवश्यकता असते तेव्हा तुम्ही सरळ इंटरनेटवर टोल फ्री अथवा कंज्यूमर केअर नंबर सर्च करता.

इंटरनेटवर मिळणाऱ्या नंबरवर कॉल करून तुम्ही तुमची समस्या सांगता, त्यामुळे तुमच्या समस्येत वाढ होते. याबद्दल बँकेचे काय म्हणणे आहे हे जाणून घ्या-

SBI ची चेतावणी काय आहे?

SBI च्या वतीने सांगितल्या गेलेल्या माहितीनुसार, ”कधीही कस्टमर सपोर्ट नंबर शोधण्यासाठी सर्च इंजिनचा वापर करू नका. यासाठी क्रेडिट कार्ड प्रोव्हायडरच्या अधिकृत वेबसाईट अथवा अधिकृत एप्लिकेशन वर जा आणि त्या ठिकाणाहून कोणताही नंबर तुम्ही मिळवू शकता. तुम्हाला वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, सपोर्टमध्ये कॉल करावा लागेल अथवा तुमच्या क्रेडिट कार्डवर लिहलेल्या नंबरवर कॉल करावा लागेल.”

यासोबत SBI कार्डचे असे म्हणणे आहे की,” कधीही OTP, CVV, PIN यासारखी माहिती कोणालाही शेर करू नका. यासोबत SBI कार्डचे प्रतिनिधी अशा प्रकारची कोणतीही माहिती विचारात नाहीत. हे लक्षात ठेवा की कोणताही टोल फ्री नंबर अथवा कस्टमर सपोर्ट नंबर फोन नंबर सारखा दिसत नाही. हा नेहमी- १८००, १८८८, १८४४ इ. यापासून सुरु होतो.” अशात तुम्हीही इंटरनेटवर टोल फ्री क्रमांक शोधण्याचा प्रयत्न केलात तर टोल फ्री क्रमांक माहिती नसताना तुम्ही अधिकृत वेबसाईटची मदत घेऊ शकता.

फसवणूक कशी केली जाते?

आजकाल काही हॅकर्स जास्त सर्च केल्या जाणाऱ्या कि वर्डवर चुकीचा टोल फ्री क्रमांक टाकतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला SBI च्या कस्टमर केरकडे काही काम असेल आणि जर तुम्ही हे इंटरनेटवर सर्च केले तर तुम्हाला एक टोल फ्री क्रमांक दिसेल, तो क्रमांक चुकीचा असू शकतो. जेव्हा तुम्ही या क्रमांकावर कॉल करता तेव्हा तुम्हाला वैयक्तिक माहिती विचारली जाते आणि त्यानंतर आपल्या खात्याला धोका होऊ शकतो.