Long Covid : कोरोना निगेटिव्ह आल्यानंतर देखील काही महिने राहू शकतात लाँग कोविडची लक्षणे, महिलांमध्ये ही समस्या अधिक

पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच दररोज कोरोनाबाबत नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. अनेक रिसर्चनुसार, सौम्य लक्षणे असलेली कोरोनाची 50 टक्के रूग्ण असे आहेत, ज्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावरही त्यांची तब्येत पूर्णपणे बरी होत नाही. अशा रूग्णांना साधारण 6 महिन्यांपर्यंत कोरोनाशी संबंधित काहीना काही समस्या होते. यालाच लॉंग कोविड किंवा पोस्ट कोविड सिंड्रोम असे म्हटले जाते.

कोरोनाची हलकी लक्षणे असलेले रूग्ण सामान्यपणे संक्रमित झाल्यावर 1 ते 2 आठवड्यात बरे होतात. तेच गंभीर लक्षणे असलेल्या रूग्णांना बरे होण्यासाठी 6 ते 7 आठवडे लागतात. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, कोरोनातून रिकव्हर झाल्यानंतर म्हणजे रूग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही जर त्यांना हलका खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, थकवा, श्वास घेण्यास त्रास, गंध न येणे, चव जाणे अशा समस्या दिसल्या तर याला लॉंग कोविड म्हटले जाते. लॉग कोविडची ही समस्या पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक दिसून येते. ब्रिटनच्या ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिसटिक्सने एक सर्वे केला होता. ज्यात 20 हजार लोकांनी सहभाग घेतला होता. या सर्व्हेतून समोर आले होते की, कोरोनाबाधित झाल्यावर प्रत्येकी 5 पैकी 1 व्यक्तीमध्ये ठीक झाल्यावरही 5 ते 12 आठवडे ही लक्षणे दिसून येतात.

ही लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष नकोः
1)सतत खोकला येणेः कोरोनामुळे जर रूग्णांला खोकला झाला असेल तर श्वसन मार्गात यामुळे इन्फ्लेमेशन होऊ शकते. ज्यामुळे इन्फेक्शन ठीक झाल्यावरही अनेक आठवडे किंवा महिन्यांपर्यंत खोकला राहतो. कोरोनामुळे तुमच्या पचन तंत्रावर फार वाईट परिणाम होतो. ज्यामुळे तुम्हाला बऱेच दिवस डायरियाची समस्या होऊ शकते.

2) भूक न लागणे – आजारातून बरे झाल्यानंतरही अनेक रूग्णांना कशाची चव लागत नाही. त्यामुळे त्यांची भूक मंदावते. ही समस्या काही आठवडे राहते.

3) थकवा अथवा कमजोरी – लॉंग कोविडने ग्रस्त साधारण 80 टक्के रूग्ण थकवा आणि कमजोरीने त्रस्त असतात, असे अनेक रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे. त्यांना ही समस्या निगेटिव्ह आल्यावरही अनेक दिवस जाणवते.