या कारणामुळे सकाळी उठल्यावर मोबाईलचा वापर शक्यतो टाळाच

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मोबाईल फोन ही आज काळाची गरज झाली आहे. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सकाळी झोपेतून उठल्यापासूनच अगदी वृद्धांपासून ते लहान मुलांपर्यंत सगळेच जण मोबाईलचा सर्रास वापर करताना आढळतात. पण या मोबाईलवर सतत वापर केल्याने आपल्या शरीराला काय हानी पोहचेल याचा आपण विचारही करत नाही. उठल्या उठल्या मोबाईल वर पाहणे चालू केले तर आपल्याला काही आजारही होऊ शकतात. त्याकडे आपण सर्रास दुर्लक्ष करतो.

पण तुम्ही जर सकाळी उठल्याउठल्या मोबाईलचा वापर करत असाल तर वेळीच सावध व्हा. नाहीतर डोकेदुखी, चिडचिडेपणा, त्वचा लाल होणे यांसारख्या अनेक विकारांना सामोरं जावं लागेल. तसेच सकाळी उठल्यानंतरचा जो पहिला १ तास असतो. तो खूप एनर्जी देणारा असतो. आणि त्या काळातच जर आपण मोबाईलचा वापर केला. तर अनावश्यक तणाव निर्माण होतो. आणि ते आपल्या मेंदूवर परिणाम करतो.

srtess

यामुळे डोकेदुखी, चिडचिडेपणा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तरुणांमध्ये मानेचा आजार खूप वाढलाय याच मुख्य कारण म्हणजे मोबाईल घेऊन आपण तासन तास एकाच स्तिथीत बसतो. त्यामुळे मानेचा त्रास वाढतो. तसेच हाताला मुंग्या येणे हि समस्या एक नव्याने सुरु झाली आहे. तिचीकारण म्हणजे आपण जास्त वेळ एकाच हातात मोबाईल घेऊन चॅटिंग करत असतो. त्या हातावर ताण आला कि, हात दुखतो. किंवा हाताला मुंग्या येतात.

त्यामुळे या आजारांना आमंत्रण द्यायचे नसेल तर आपण सकाळी उठल्या उठल्या मोबाईल हातात घेणं कटाक्षाने टाळावं, रात्री झोपताना मोबाईल जवळ घेऊन झोपू नये, तसेच झोपताना इंरनेट बंद करून झोपावे, सकाळी नाष्टा करतानाही मोबाईल जवळ घेऊन बसू नये. आपले आरोग्य सुरक्षित राहावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर सकाळी सकाळी मोबाईलचा वापर टाळा.

फेसबुक पेज लाईक करा –