कोल्हापूर परिक्षेत्रातील 39 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

कोल्हापूर परिक्षेत्रातील तब्बल 39 पोलिस निरीक्षकांच्या मंगळवारी रात्री उशिरा बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याबाबतचे आदेश कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी दिले. बदली झालेल्या 39 पोलिस निरीक्षकांपैकी 30 पोलिस निरीक्षकांची प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आली आहे तर 9 निरीक्षकांच्या बदल्या हया विनंतीवरून करण्यात आल्या आहेत.
प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आलेल्या पोलिस निरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली आहे हे पुढील प्रमाणे –

निशीकांत हनुमंत भुजबळ (कोल्हापूर ते सांगली), शैकत अबुलाल जमादार (कोल्हापूर ते सांगली), अशोक विश्‍वासराव धुमाळ (कोल्हापूर ते पुणे ग्रामीण), अनिल रामचंद्र गाडे (कोल्हापूर ते सोलापूर ग्रामीण), अरविंद दौलत चौधरी (कोल्हापूर ते पुणे ग्रामीण), सदाशिव गोविंद शेलार (सांगली ते पुणे ग्रामीण), रविंद गणपतराव डोंगरे (सांगली – यांना प्रशासकीय कारणास्तव 1 वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे), राजू धोंडीराम मोरे (सांगली ते पुणे ग्रामीण), राजेंद्र एकनाथ मोरे (सांगली ते पुणे ग्रामीण), प्रताप धोंडीराम पोमण (सांगली – यांना प्रशासकीय कारणास्तव 1 वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे), राजेंद्रकुमार हिंदुराव राजमाने (सातारा ते पुणे ग्रामीण), प्रकाश दिगंबर सावंत (सातारा – यांना प्रशासकीय कारणास्तव 1 वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे), अशोक बापू शेळके (सातारा ते पुणे ग्रामीण), दत्‍तात्रय मधुकर कुलथे (सातारा – यांना प्रशासकीय कारणास्तव 1 वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे),

पी.बी. घनवट (सातारा – यांना प्रशासकीय कारणास्तव 1 वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे), संभाजी खंडू म्हेत्रे (सातारा ते कोल्हापूर), सुरज बंडू बंडगर (सोलापूर ग्रामीण ते पुणे ग्रामीण), मधुकर आनंदराव पवार (सोलापूर ग्रामीण ते पुणे ग्रामीण), चंद्रकांत कृष्णा निरावडे (सोलापूर ग्रामीण ते कोल्हापूर), दिपक सोपानराव पवार (सोलापूर ग्रामीण ते सांगली), विश्‍वास हरिभाऊ साळोखे (सोलापूर ग्रामीण ते सातारा), सर्जेराव बाजीराव पाटील (पुणे ग्रामीण ते सोलापूर ग्रामीण), सजन विठोबा हंकारे (पुणे ग्रामीण ते सातारा), विजय शामराव जाधव (पुणे ग्रामीण ते सोलापूर ग्रामीण), बंडोपंत आण्णा कोंडुभेरी (पुणे ग्रामीण ते सातारा), इरगोंडा सतगोंडा पाटील (पुणे ग्रामीण ते कोल्हापूर), विश्‍वंभर भिमराव गोल्डे (पुणे ग्रामीण ते सोलापूर ग्रामीण), प्रदिप शिवाजी काळे (पुणे ग्रामीण ते कोल्हापूर) आणि अमरनाथ रामचंद्र वाघमोडे (पुणे ग्रामीण ते सातारा).

विनंतीवरून बदल्या करण्यात आलेल्या पोलिस निरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली आहे ते पुढील प्रमाणे

प्रताप विठोबा मानकर (सांगली ते पुणे ग्रामीण), अंबरूषी दत्‍तात्रय फडतरे (सातारा ते कोल्हापूर), प्रमोद विष्णू जाधव (सातारा ते कोल्हापूर – तात्पुरते कामकाज विपोमनि.,को.परि.), कृष्णदेव कल्पना खराडे (सोलापूर ग्रामीण ते पुणे ग्रामीण), विठ्ठल दिगंबर दबडे (सोलापूर ग्रामीण ते पुणे ग्रामीण), वसंतराव दादासो बाबर (पुणे ग्रामीण ते कोल्हापूर), भगवान बबनराव निंबाळकर (पुणे ग्रामीण ते सोलापूर ग्रामीण), धनंजय अनंतराव जाधव (कोल्हापूर ते सोलापूर ग्रामीण) आणि मानसिंग श्रीनिवास खोचे (पुणे ग्रामीण ते कोल्हापूर).

विशेष पोलिस महानिरीक्षकांनी ज्या पोलिस निरीक्षकांची बदलीची विनंती अमान्य केली आहे त्या पोलिस निरीक्षकांची नावे आणि त्या पुढील कंसात ते कोठे नेमणुकीस आहेत ते पुढील प्रमाणे

अशोक मारूती कदम (सांगली), युवराज मारूती मोहिते (सांगली), अशोक आनंदराव भवड (सांगली), रविंद्र धैर्यशील शेळके (सांगली), भाऊसाहेब नारायण पाटील (सातारा) आणि सतीश बाबुराव पवार (कोल्हापूर).