Kolhapur ACB Trap | फसवणुकीच्या गुन्ह्यात ८ लाखांची लाच घेताना एपीआयसह दोघांना पकडले; जुना राजवाडा पोलीस ठाण्यात मध्यरात्री कारवाई

कोल्हापूर : Kolhapur ACB Trap | फसवणुकीच्या (Fraud Case) एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी तब्बल ८ लाख रुपयांची लाच (Bribe) पोलीस ठाण्यात घेत असताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Kolhapur ACB Trap) सहायक पोलीस निरीक्षक (Assistant Inspector of Police) व काँस्टेबलला पकडले. जुना राजवाडा पोलीस ठाण्यातच (Rajwada Police Station) मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली.

सहायक पोलीस निरीक्षक नागेश म्हात्रे (Assistant Police Inspector Nagesh Mhatre) आणि पोलीस कॉन्स्टेबल रुपेश कुंभार (Police Constable Rupesh Kumbhar) अशी या दोघांची नावे आहेत. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Kolhapur ACB Trap) इतक्या रात्री कारवाई केल्याने कोल्हापूर पोलीस दलात (Kolhapur Police) एकच खळबळ उडाली आहे. कारवाईनंतर दोघांना ताब्यात घेतल्यावर नागेश म्हात्रे यांची तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

एका फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास एपीआय नागेश म्हात्रे याच्याकडे होता.
त्यात मदत करण्यासाठी म्हात्रे याने ८ लाख रुपयांची मागणी केली होती.
तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रार केली.
त्याची पडताळणी केल्यावर लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
म्हात्रे याने पोलीस कॉन्स्टेबल रुपेश कुंभार मार्फत पैसे देण्यास बोलावले.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने काळजी घेत सांगली येथील पथकामार्फत जुना राजवाडा परिसरात सापळा रचला.
तक्रारदाराकडून ८ लाख रुपये घेताना दोघांना पकडले.

Web Title : Kolhapur ACB Trap | Two with API caught while accepting bribe of 8 lakhs in fraud case; Midnight action at Juna Rajwada Police Station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Siddharth Shirole | विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल कामासाठी खास बैठक घ्यावी; आमदार शिरोळे यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

Akola ACB Trap | फेरफारनोंद करुन 7/12 उतारा वेगळा करण्यासाठी लाचेची मागणी, तलाठी अँन्टी कप्शनच्या जाळ्यात