MLA Siddharth Shirole | विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल कामासाठी खास बैठक घ्यावी; आमदार शिरोळे यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  MLA Siddharth Shirole | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील (Vidyapeeth Chowk Pune) उड्डाणपुलाचे काम या वर्षाच्या अखेरीपर्यंत गतीने पूर्ण होण्यासाठी महापालिका (Pune PMC) , पीएमआरडीए (PMRDA), वाहतूक पोलीस (Pune Traffic Police) आदी खात्यांची खास बैठक आपल्या अध्यक्षतेखाली घ्यावी, अशा मागणीचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (शुक्रवारी) मुंबईत दिले. (MLA Siddharth Shirole)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील प्रस्तावित उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर घेणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या वाहतूक पोलीस खात्यासह अन्य खातीही वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, त्यात अपेक्षित यश येत नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उड्डाणपूल उभारणीचा कालावधी कमी करता येईल का? याचा अहवालही येणे बाकी आहे. अशा महत्वाच्या बाबी आमदार शिरोळे यांनी मुख्य मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. हा उड्डाणपूल तयार झाल्यानंतर पुणे विद्यापीठ रस्त्यावरची बहुतांश वाहतूक समस्या सुटली जाईल. सध्या वाहतुकीच्या गर्दीच्या वेळेमध्ये लोकांना शिवाजीनगर ते बाणेरला जायला जवळ जवळ एक ते दीड तास लागतो, तसेच औंध भागामध्ये सुद्धा ह्या वाहतूक कोंडीचा भरपूर प्रभाव पडत आहे, असे पत्रात नमूद केले आहे. (MLA Siddharth Shirole)

याबाबत माननीय मुख्य मंत्र्यांनी सकरात्मक प्रतिसाद देत लवकरच बैठकीचे आयोजन करू
असे आश्वासन आमदार शिरोळे यांना दिले.

Web Title : MLA Siddharth Shirole | A special meeting should be held for the flyover work at Vidyapeeth Chowk; MLA Shirole’s demand to the Chief Minister

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik Crime News | 10 वीच्या परीक्षेदरम्यान सुपरवायझिंगला आलेल्या सरांचे
हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

Youth Congress-Pune | शेतकरी, युवकांच्या प्रश्नावर युवक काँग्रेस 20 मार्चला घालणार विधिमंडळाला घेराव;
युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मितेंद्र सिंग, प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांची पत्रकार परिषदेत माहिती

Gravittus Foundation | सामाजिक कार्यकर्त्या शीलाताई आढाव यांना ग्रॅव्हिटस फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर

Annasaheb Patil Mahamandal | आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांचा लाभ मराठा समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी बँकांनी प्रयत्न करावेत – नरेंद्र पाटील

Urfi Javed | उर्फी जावेदने ‘या’ कारणामुळे खतरो के खिलाडी कार्यक्रमास दिला नकार

MLA Sada Sarvankar | शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांना ‘त्या’
प्रकरणात पोलिसांकडून ‘क्लिन चीट’

Gold-Silver Price Today | पुण्यात सोने झाले महाग; जाणून घ्या पुण्यातील आजचे दर