Kolhapur ACB Trap | शौचालय बिल मंजूर करण्यासाठी 10 टक्के कमिशन, 30 हजारांची लाच घेताना ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – बांधलेल्या शौचालयांचे बिल मंजूर (Toilet bill approved) करण्यासाठी 10 टक्के कमिशनने (Commission) लाच मागणाऱ्या (Demanding Bribe) करवीर तालुक्यातील कुर्डू ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्याला कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Kolhapur ACB Trap) रंगेहाथ पकडले. ग्रामसेवक महादेव गणपती डेंगळे Mahadev Ganapati Dengle (रा. कुर्डू ता. करवीर) व ग्रामपंचायत सदस्य धनाजी भारती पाटील (Dhanaji Bharti Patil) अशी लाच घेताना (Accepting Bribe) रंगेहात पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. कोल्हापूर एसीबीने (Kolhapur ACB Trap) ही कारवाई दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून केली.

 

तक्रारदार यांनी कुर्डू गावातील 2 लाख 99 हजार 437 रुपयांचे सार्वजनिक शौचालय बांधण्याचे काम करवीर पंचायत समितीकडून मिळाले होते. त्यांना या कामाचे बिल पंचायत समितीकडून 2 लाख 10 हजार, तर ग्रामपंचायतीकडून 89 हजार 437 रुपये मिळणार होती. मंजूर रकमेपैकी तक्रारदार यांना 1 लाख 97 हजार रुपये मिळाले होते. उर्वरित रक्कम कुर्डू ग्रामपंचायतीकडून मिळणार होती. त्यामुळे तक्रारदार यांनी ग्रामसेवकांना भेटून बिलाची मागणी केली असता डेंगळे याने पंचायत समितीकडून बिल मंजूर केल्याबद्दल तसेच उर्वरित रक्कम देण्यासाठी 2 टक्के कमिशन मागितले. तर ग्रामपंचायत सदस्य पाटील यांनी बिल मंजूर करण्यास मदत केली म्हणून 8 टक्के कमिशन मागितले.

 

तक्रारदार यांनी बुधवारी (दि.28) कोल्हापूर एसीबीकडे (Kolhapur ACB Trap) तक्रार केली. बुधवारी धनाजी पाटीलच्या घरी लाचेची मागणीची पडताळणी केली असता धनाजी याने स्वत:साठी तसेच ग्रामसेवक डेंगळेसाठी एकूण बिलाच्या 10 टक्के कमिशनने 30 हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तर ग्रामसेवक डेंगळे याने देखील लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

 

डेंगळे याने वाशीमध्ये लाचेची रक्कम घेऊन येण्यास तक्रारदार यांना सांगितले. वाशी येथे सापळा रचून डेंगळे याला 5 हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले. तर ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील याने हळदी येथे येण्यास सांगितले. त्याठिकाणी सापळा रचून पाटील याला तक्रारदार यांच्याकडून 25 हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे (ACB Pune Region)
पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav),
पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत (Deputy Superintendent of Police Adinath Budhwan)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार शरद पोरे, विकास माने, मयुर देसाई, रुपेश माने यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Kolhapur ACB Trap | village panchayat member along with
village development officer jailed for accepting bribe of rs 30 thousand

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा